महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोनाशी लढा; केरळच्या डॉक्टर, परिचारिकांचे पथक मुंबईकडे रवाना - लेटेस्ट न्यूज इन मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केरळकडे 100 डॉक्टर आणि परिचारिका मदतीसाठी देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या मागणीनंतर केरळने हे पथक देऊ केले आहे. या रविवारी टीव्हीएम रुग्णालयाचे उपाधीक्षक संतोष कुमार यांच्या नेतृत्वात हे पथक मुंबईकडे रवाना झाले आहे.

Fight
मंत्री थॉमस इसाक

By

Published : Jun 1, 2020, 5:22 AM IST

तिरुवनंतपुरम/ मुंबई- कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकारने केरळच्या डॉक्टर आणि परिचारिकांची मागणी केली होती. त्याला केरळने सकारात्मक प्रतिसाद देत 100 डॉक्टर आणि परिचारिकाचे पथक मुंबईकडे रवाना केले आहे. याबाबतची माहिती केरळचे मंत्री थॉमस इसाक यांनी दिली आहे.

मुंबईतील कोरोनाचा कहर रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केरळकडे 100 डॉक्टर आणि परिचारिका मदतीसाठी देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या मागणीनंतर केरळने हे पथक देऊ केले आहे. या रविवारी टीव्हीएम रुग्णालयाचे उपाधिक्षक संतोष कुमार यांच्या नेतृत्वात हे पथक मुंबईकडे रवाना झाले आहे. डॉक्टरला काम करताना कोणतीही सीमारेषा असत नाही, असे ट्विट यावेळी मंत्री थॉमस इसाक यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details