मुंबई -मुलुंड येथे एका हॉटेलमध्ये केनियन नागरिकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्तीचे नाव सायरस ओमांडी असून तो 39 वर्षाचा आहे. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मुलुंडच्या एका हॉटेलमध्ये केनियन नागरिकाचा मृतदेह; मृत्यूचे कारण अस्पष्ट - mulund police station news
मुलुंड येथे एका हॉटेलमध्ये केनियन नागरिकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्तीचे नाव सायरस ओमांडी असून तो 39 वर्षाचा आहे. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मुलुंडमध्ये भरवण्यात आलेल्या कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी काही विद्यार्थ्यांना सोबत घेऊन केनियन नागरिक सायरस ओमांडी हे नुकतेच भारतात आले होते. चॅम्पियनशिप संपल्यानंतर त्यांचे सहकारी आणि काही विद्यार्थी पुन्हा केनियात परतले. परंतु सायरस आणि त्यांचा एक सहकारी भारतातच थांबले होते.
11 फेब्रुवारीला रात्रीच्या जेवणानंतर त्यांनी हॉटेलमध्ये आरक्षित केलेल्या खोलीत प्रवेश केला. दुसऱ्या दिवशी सायरस यांचा गाईड दुपारी हॉटेलमध्ये आला. त्याने सायरस यांच्याशी संपर्क साधल्यानंतर खोलीतून कोणताही प्रतिसाद न आल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी बनावट चावीमार्फत दरवाजा उघडला. यावेळी त्यांना सायरस जमिनीवर पडलेले दिसले. या घटनेची माहिती मुलुंड पोलिसांना देण्यात आली. सायरस यांचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. ते केनियातील शिक्षण समितीचे सदस्य होते.