महाराष्ट्र

maharashtra

KEM Hospital केईएम रुग्णालयात मायक्रोटिका झालेल्या मुलांसाठी देवदूत

KEM Hospital लहान मुलांमध्ये मायक्रोटिका हा आजार होतो. या आजारामुळे लहान वयात मुलांना ऐकू येत नाही. याचा परिणाम त्यांच्या पुढील आयुष्यात होतो. ( KEM Hospital ) मायक्रोटिया हा आजार १० हजारातून एखाद्या मुलाला होता. मात्र, यावरील शस्त्रक्रिया ही वयाच्या १० ते १५ वर्षांपर्यंत करणे गरजेचं आहे.

By

Published : Sep 23, 2022, 7:33 PM IST

Published : Sep 23, 2022, 7:33 PM IST

ETV Bharat / city

KEM Hospital केईएम रुग्णालयात मायक्रोटिका झालेल्या मुलांसाठी देवदूत

KEM Hospital
KEM Hospital

मुंबईलहान मुलांमध्ये मायक्रोटिका हा आजार होतो. या आजारामुळे लहान वयात मुलांना ऐकू येत नाही. याचा परिणाम त्यांच्या पुढील आयुष्यात होतो. मायक्रोटिया हा आजार १० हजारातून एखाद्या मुलाला होता. मात्र, यावरील शस्त्रक्रिया ही वयाच्या १० ते १५ वर्षांपर्यंत करणे गरजेचं आहे. अशा १८ लहान मुलांवर पालिकेच्या केईएम रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. या लहान मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून पालिकेच्या डॉक्टरांनी देवदूताचे काम केले आहे.

शस्त्रक्रिया मोफतमुंबई महानगरपालिकेच्या ( Mumbai Municipal Corporation ) केईएम रुग्णालयात ( KEM Hospital ) गेल्या दोन वर्षे नाशिक येथील रौनक देहाडेवर उपचार सुरु होते. त्याला मायक्रोटिया हा आजार होता. १० हजारातून एखाद्या मुलाला होता. मात्र, यावरील शस्त्रक्रिया ही वयाच्या १० ते १५ वर्षांपर्यंत करणे गरजेचं आहे. हा आजार मुलांना जन्मताच होता. हा एक दुर्मिळ जन्म दोष आहे. ज्यामुळे कानाचा बाह्य भाग लहान आणि चुकीचा आकारचा दिसतो. पुढे जाऊन यामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. केईएमच्या डॉक्टरांनी रौनकवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या शस्त्रक्रियेनंतर रौनकला तब्बल ८ लाख रुपयांचे श्रवण यंत्र बसवले जाणार आहे. रौनकचे वडिल संपत दहाडे हे एका खासगी कार्यालयात काम करतात. श्रावण यंत्र बसवण्यासाठी लागणाऱ्या यंत्राचा खर्च केईएममधील डॉक्टरांनी पुढाकार घेऊन देणगीदाराशी संपर्क साधून जमवला आहे. तसेच शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली आहे. रौनकवरील शस्त्रक्रिया ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचे केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी म्हटले आहे.

आतापर्यंत १८ मुलांवर शस्त्रक्रिया रौनकच्या कानावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. कानामागची जखम बरी झाल्यानंतर कानाच्या बाह्य भागामध्ये मायक्रोफोन, स्पीच प्रोसेसर आणि हेड पीस बसवण्यात येणार आहेत. एकदा का हे श्रवणयंत्र बसवल्यानंतर बरं होण्यास एक महिन्याचा कालावधी लागतो. एक महिन्यानंतर यंत्राची प्रोसेसर सुरू करण्यात येईल. रौनक सारखी शस्त्रक्रिया आतापर्यंत १८ मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे असे डॉ. रावत यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details