महाराष्ट्र

maharashtra

Kedar Dighe Granted Pre Arrest Bail : केदार दिघे यांना बलात्कार पीडित महिलेला धमकावल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर

By

Published : Aug 7, 2022, 6:45 AM IST

मुंबईत एका महिलेवर हाॅटेलमध्ये अत्याचार केल्यानंतर धमकावल्याप्रकरणी शिवसेना ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे मुंबई सत्र न्यायालयाने ( Mumbai Sessions Court ) अटकपूर्व जामीन मंजूर ( Kedar Dighe Granted Pre-Arrest Bail ) केला आहे. बलात्कार प्रकरणात केदार दिघे ( Shiv Sena Thane District President Kedar Dighe ) यांना मध्यस्थीकरिता रोहित कपूरने बोलावले होते. त्यावेळी त्यांनी पीडित महिलेला धमकावून पैसे घेऊन गप्प राहण्यास सांगितले. यासंदर्भात महिलेने केदार दिघेंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

Shiv Sena Thane District President Kedar Dighe
शिवसेना ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे

मुंबई :शिवसेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे यांना बलात्कार महिलेला धमकावल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये मुंबई सत्र न्यायालयाने ( Mumbai Sessions Court ) 6 ऑगस्ट रोजी अटकपूर्व जामीनअर्ज काही अटी व शर्तीवर मंजूर ( Kedar Dighe Granted Pre-Arrest Bail ) केला आहे. त्यामुळे केदार दिघे ( Shiv Sena leader Kedar Dighe ) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केदार दिघे हे ठाण्यातील आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. परंतु, या प्रकरणाच्या तपासात संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यकता पडेल तेव्हा सहकार्य करण्याची अट सत्र न्यायालयाने घातली आहे.


मेम्बरशीप देण्याच्या बहाण्याने बोलावून अत्याचार : मुंबईतील ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात ( N M Joshi Marg Police Station ) एका 23 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली होती. तक्रारदार महिला ह्या खासगी कंपनीत क्लब अ‍ॅम्बेसिडर ( Works as Club Ambassador ) म्हणून काम करतात. मुंबईत येणाऱ्या पाहुण्यांना क्लबच्या मेंबरशिपबाबत माहिती देण्याचे काम करतात. केदार दिघे यांच्या मित्राने 28 जुलै रोजी सेंट रेजीस हॉटेलमध्ये मेम्बरशीप घेण्याच्या बहाण्याने जेवणासाठी बोलावले होते. त्यानंतर क्लब मेम्बरशीपचे पैसे देण्यासाठी रूममध्ये थांबण्यास सांगितले. त्यानंतर रोहित कपूरने बलात्कार केला असल्याची तक्रार पीडित महिलेने दिली आहे.


पीडित महिलेने विचारला जाब : या घटनेमुळे घाबरलेल्या महिलेने या घटनेची कुठेही वाच्यता केली नाही. मात्र, त्यानंतर 31 जुलै रोजी पीडित महिलेने आपल्यावर बेतलेला प्रसंग तीन मित्रांना सांगितला. पीडितेने रोहित कपूरला व्हॉट्सअ‍ॅपवर याबाबत जाब विचारला. रोहित कपूरने पीडित महिलेला व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक केले. त्यानंतर पीडित महिलेने वारंवार संपर्क करून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना कुठलेही उत्तर न देता धमकावण्यात आले.



काय आहे प्रकरण :त्यानंतर एक ऑगस्ट रोजी पीडित महिलेने आपल्या मित्रांमार्फत आरोपीला विचारणा केली. मात्र, आरोपी रोहित कपूरने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आरोपी रोहित कपूर याने त्याचा मित्र केदार दिघे याच्या मध्यस्थीने पैसे घेऊन सदर घटनेबाबत कोणालाही वाच्यता न करण्यास सांगितले. मात्र, पीडितेने याला नकार दिला. या नकारानंतर केदार दिघे यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप आहे. त्यानंतर आता तक्रारदार महिलेने दिलेल्या जबावावरून ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात आरोपी रोहित कपूर व केदार दिघे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.



हेही वाचा: Varsha Raut ED Inquiry : पत्राचाळ प्रकरणी वर्षा राऊतांची ईडीकडून 9 तास चौकशी

ABOUT THE AUTHOR

...view details