महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kavya Thapar Arrested : महिला पोलिसांशी गैरवर्तन भोवले, अभिनेत्री काव्या थापरला अटक - काव्या थापरला अटक मराठी बातमी

जुहू पोलिसांनी काव्या थापरला अटक केली ( Kavya Thapar Arrested ) आहे. दारुच्या नशेत काव्या थापरने महिला पोलिसांशी गैरवर्तन केले होते.

Kavya Thapar
Kavya Thapar

By

Published : Feb 18, 2022, 1:25 PM IST

मुंबई -दारुच्या नशेत महिला पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी अभिनेत्री काव्या थापरला अटक केली ( Actress Kavya Thapar Arrested ) आहे. याप्रकरणी पोलिसांनी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला ( Juhu Police Register Fir Kavya Thapar ) होता. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुधवारी रात्रीच्या सुमारास दारुच्या नशेत काव्या थापरने एका गाडीला धडक दिली होती. जे डब्ल्यू मेरेड हॉटेलजवळ हा अपघात झाला होता. ही माहिती नियंत्रण कक्षाला कळल्यानंतर पोलिसांचे निर्भया पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी नशेत असलेल्या काव्या थापरने महिला पोलिसांशी गैरवर्तन करत त्यांना मारहाण केली. याविरोधात जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी काव्या थापरला आता अटक केली आहे.

हेही वाचा -ED arrests Iqbal Kaskar : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर ईडीच्या ताब्यात

ABOUT THE AUTHOR

...view details