महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

काश्मिरी मुलींचा क्रिकेट संघ प्रथमच मुंबईत दाखल, दिलीप वेंगसरकरांनी केले मार्गदर्शन - काश्मिरी मुलींचा क्रिकेट संघ

काश्मीरमधील अनंतनाग येथील एक मुलींची क्रिकेट टीम पहिल्यांदाच क्रिकेट खेळण्याच्या निमित्ताने काश्मीर मधून बाहेर पडली आहे. त्यांची नुकतीच पुण्यात आसाम रायफलसच्या संघाबरोबर मॅच पार पडली आहे. त्यानंतर आता या मुली आज मुंबई पाहण्यासाठी पहिल्यांदाचं मुंबईत आल्या होत्या. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी स्वतः प्रसिद्ध माजी कर्णधार दिलीप वेंगसकर उपस्थित होते.

काश्मिरी मुलींचा क्रिकेट संघ प्रथमच मुंबईत दाखल
काश्मिरी मुलींचा क्रिकेट संघ प्रथमच मुंबईत दाखल

By

Published : Feb 9, 2021, 10:25 PM IST

मुंबई - काश्मीरमधील अनंतनाग येथील एक मुलींची क्रिकेट टीम पहिल्यांदाच क्रिकेट खेळण्याच्या निमित्ताने काश्मीर मधून बाहेर पडली आहे. त्यांची नुकतीच पुण्यात आसाम रायफलसच्या संघाबरोबर मॅच पार पडली आहे. त्यानंतर आता या मुली आज मुंबई पाहण्यासाठी पहिल्यांदाचं मुंबईत आल्या होत्या. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी स्वतः प्रसिद्ध माजी कर्णधार दिलीप वेंगसकर उपस्थित होते. या टीमच विशेष म्हणजे त्यांच्या खेळाचं याआधी सचिन तेंडुलकर आणि इरफान पठाण यांनी देखील कौतुक केलं होत. असीम फौंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमाबाबत बोलताना संघाची कर्णधार म्हणाली की, आशा प्रकारचा उपक्रम आमच्या साठी राबवला यासाठी रोटरी क्लब आणि असीम फौंडेशनचे खुप आभार. असे उपक्रम सतत होणे गरजेचे आहे.

काश्मीर येथील अनंतनाग जिल्ह्यातील डोरू येथील १३ काश्मिरी मुलींचा धाडसी क्रिकेट संघ प्रथमच मुंबई येथे आला असून मुंबईत आल्यावर त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्याशी गप्पा मारत त्यांचे मार्गदर्शन घेतले.

काश्मिरी मुलींचा क्रिकेट संघ प्रथमच मुंबईत दाखल
मुंबईत प्रभादेवी येथे त्यांचा संघ दाखल झाल्यावर विविध संघटनानी त्यांचे स्वागत केले. काश्मिरी मुलीना खेळात व्यासपीठ मिळावे, यासाठी आसिम फाउंडेशन आणि इनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे बेव्यू यांच्या पुढाकारातून त्याना मुंबईत आणण्यात आले. ऑक्टोबरमध्ये डोरू येथे क्रिकेटचे सामने खेळविण्यात आले होते त्यावेळेस सचिन तेंडुलकर आणि इरफान पठान यांनी त्यांना प्रेरणा दिली होती. तेव्हापासून त्यांना मुंबईत येवून खेळण्याची इच्छा होती असे असीम फाऊंडेशनचे अध्यक्ष सारंग गोसावी यांनी सांगितले.
मुंबईत येण्याची इच्छा असलेल्या काश्मिरी मुलींच्या संघाने मुंबईत आल्यानंतर आनंद व्यक्त केला. मुंबई दर्शन करून ते पुणे येथे होणाऱ्या क्रिकेट सामन्यात सहभाग घेणार आहेत.गेल्या दहा वर्षांपासून काश्मीर मध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेत असून काहीतरी करून दाखविण्याची जिद्द असून मुंबईत आल्याचा खूप आनंद होत असल्याची प्रतिक्रिया मुलीनी दिली.मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे मुंबईत येवून आमच्या मुलींचा संघ खूश असून खेळात नक्की प्रगती साध्य करील असे अनंतनाग महिला क्रिकेट स्पोर्ट्सचे प्रशिक्षक अब्दुल रशीद अय्यंगर यांनी सांगितले. क्रिकेटचा सराव करीत असताना ज्याप्रमाणे आपण एखादा सामना खेळत असतो त्याचप्रमाणे सराव देखील तितक्याच ताकदीने केला पाहिजे असे मार्गदर्शन भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details