मुंबई -अलमट्टी धरणातून होणार्या पाण्याच्या विसर्गामुळे पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागते. त्यामुळे या पूरनियंत्रणाचं काम महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कस चांगलं होईल यादृष्टीने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी शनिवारी सकाळी १०.३० वाजता बैठक होणार आहे.
'कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी शनिवारी अलमट्टीप्रकरणी चर्चा करणार' - जयंत पाटील
अलमट्टी धरणातून होणार्या पाण्याच्या विसर्गामुळे पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे या पूरनियंत्रणाचं काम महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या समन्वयाने करण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांच्या सोबत शनिवारी सकाळी १०.३० वाजता बैठक होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
जयंत पाटील
Last Updated : Jun 18, 2021, 12:27 PM IST