मुंबई-बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत व तिची बहीण रंगोली चंदेल या दोघी बहिणींना चौकशीसाठी मुंबई पोलिसांकडून समन्स बजावण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना येत्या सोमवारी आणि मंगळवारी असे दोन दिवस बांद्रा पोलीस ठाण्यात हजर रहावे लागणार आहे. एका वादग्रस्त ट्विट प्रकरणात न्यायालयाने त्या दोघींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून, त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे.
कंगना रणौतला चौकशीसाठी मुंबई पोलिसांकडून समन्स
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत व तिची बहीण रंगोली चंदेल या दोघी बहिणींना चौकशीसाठी मुंबई पोलिसांकडून समन्स बजावण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना येत्या सोमवारी आणि मंगळवारी असे दोन दिवस बांद्रा पोलीस ठाण्यात हजर रहावे लागणार आहे. एका वादग्रस्त ट्विट प्रकरणात न्यायालयाने त्या दोघींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून, त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवला आहे.
कंगना राणावत
दरम्यान काही दिवसांपूर्वी कंगना रणौतच्या ट्विटर अकाऊंटवरून एक वादग्रस्त ट्विट करण्यात आले होते. त्यामध्ये म्हटले होते की, बॉलिवूडमध्ये हिंदू- मुस्लीम तणाव असून, मुस्लीम कलाकार आणि हिंदू कलाकार यांच्यामध्ये मतभेद आहेत. या ट्विटमुळे सामाजिक द्वेष वाढल्याचा आरोप करत, मूनवर आली खान यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या आधारे न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.