मुंबई - बलात्काराच्या आरोपावरून कांदिवली पोलिसांनी गुजरातमधून एका भोंदूबाबाला अटक केली आहे. एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका भोंदूबाबाला मुंबईच्या कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे.
महिलेचा बलात्काराचा आरोप
काही महिन्यांपूर्वी कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेने, भोंदू बाबाने आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. पोलिसांही ही माहिती दिलीय.
त्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवली. तसेच एका आरोपी भोंदूबाबाला अटक केली आहे. आता दुसऱ्या आरोपी बाबाला 30 सप्टेंबर रोजी गुजरातमधून अटक करण्यात आली आहे.
गौतम गिरी गोसावीला अटक
अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव गौतम गिरी गोसावी आहे. त्याचे वय 26 वर्षे आहे. महिलेने या बाबावर बलात्काराचा आरोप केला आहे. कांदिवली पोलिसांनी भोंदू बाबाला अटक केली. न्यायालयात हजर केले असता बाबाला 5 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.