मुंबई -अश्लील कंटेंट बनवणे आणि तो मोबाईल ॲप्सद्वारे प्रसारित करणे या आरोपाखाली व्यावसायिक राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणानंतर राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांची खूप खिल्ली उडवली जात आहे. या यादीत कमाल राशिद खान देखील मागे नाही. कमाल खान याने ट्विट करत राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी या दोघांना चांगल्याच कोपरखळ्या दिल्या.
कमाल राशिद खान आपल्या ट्विटमध्ये लिहितात -
मुंबई पोलीस यांच्या मतानुसार राज कुंद्रा पॉर्न इंडस्ट्रीचे राजा बनायचे प्लानिंग करत होते. राज कुंद्रा जगभरामध्ये पॉर्नची लाईव्ह स्ट्रिमिंग करण्याच्या तयारीत होते. वाह काय प्लान आहे. कुंद्रा भैय्या की जय हो शिल्पा भाभी की जय हो.