मुंबई : छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे दोन दिवसीय 'धर्म संसद' ( Chhattisgarh Dharam Sansad ) आयोजित करण्यात आली होती. देशभरातून धर्माचे अनुयायी आणि महामंडलेश्वर यात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात संबोधित करताना कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्या ( kalicharan Maharaj On Mahatma Gandhi ) बद्दल अपशब्द वापरल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यावरती आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक ( Ncb Nawab Malik ) यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. "हा महात्मा गांधी यांचा नाही तर देशाचा अपमान आहे. कालीचरणवर देशद्रोहाचा खटला दाखल करावा," अशी मागणी त्यांनी केली ( Nawab Malik Demand Action On Kalicharan Maharaj ) आहे.
प्रसारमाध्यामांशी संवाद साधताना नवाब मलिक म्हणाले की, "ज्या प्रकारे छत्तीसगड मध्ये बनावट साधू कालीचरण याने महात्मा गांधी ( kalicharan Maharaj On Mahatma Gandhi ) यांचा अपमान केला आहे. त्यांना शिवीगाळ केली आहे. हा महात्मा गांधी यांचा नाही तर देशाचा अपमान आहे. कालीचरण याच्यावर देशद्रोहाचा खटला भरला जावा. तो महाराष्ट्रातील अकोल्याची असल्याची माहिती मिळत आहे. आम्ही कालीचरण याच्यावर गुन्हासाठी राज्य सरकारला अवगत करणार असल्याचेही त्यांनी म्हटलं."
ओबीसी आरक्षण संदर्भात ठराव