मुंबई - 'काली' चित्रपटाच्या पोस्टरवरून सुरू झालेला वाद आता वाढतच चालला आहे. सोशल मीडियावरून सुरू झालेला वाद इतका वाढला की हे प्रकरण एफआयआर ( FIR ) पर्यंत पोहोचले आहे. दिल्ली पोलीस तसेच उत्तर प्रदेश पोलिसांनी काली चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात एफआयआर ( FIR against Kali film ) नोंदवला असून चित्रपटाच्या निर्मात्या लीना मणिमेकली ( Lina Manimekali ) यांच्यावर हेतुपुरस्सर धार्मिक भावना दुखावणे, शांतता भंग केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, या प्रकरणावर अनेक सेलिब्रिटी व्यक्त होत आहेत. भजनसम्राट अनुप जलोटा ( Anup Jalota ) यांनी देखील सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत या वादात उडी घेतली आहे.
स्वस्तातली लोकप्रियता नको -अनुप जलोटा व्हिडिओमध्ये म्हणाले की, "नीला जी तुमच्या चित्रपटाचं पोस्टर बघून तुम्ही स्वस्त लोकप्रियतेच्या मागे असल्यासारखं वाटतं. तुम्ही अशी स्वस्त लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे दंगली होतात. त्यामुळे लोकांच्या मनात असंतोष निर्माण होतो. लोक रस्त्यावर येतात आणि निष्पाप लोक मारले जातात. आजकाल देशात जे काही चालले आहे ते तुम्ही पाहत किंवा ऐकत नाही? कुठं टेलर मारले जातात तर कुठं केमिस्ट मारले जातात आहेत. हे सर्व लोक निर्दोष असतात आहेत."