मुंबई -मुंबईत पर्यटनाला सुरुवात करताना गेट वे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय, जहांगीर कला दालन आणि येते मग काळा घोडा परिसराचे नाव. लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. काळा घोडा ( Mumbai Kala Ghoda ) या नावावरुन फेस्टिव्हलचे देखील आयोजन करण्यात येते. तर, आपण काळा घोडा पुतळा आणि परिसराबाबत जाणून घेणार आहोत.
ब्रिटीशांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अल्बर्ट ससून यांनी 1879 साली हा पुतळा बांधला होता. 26 जून 1879 साली माजी गव्हर्नर सर रिचर्ड टेंपल यांनी त्याचे उद्घाटन केले. तेव्हा जहांगीर आर्ट गॅलरीच्या समोर पुतळा बांधण्यात आला. पुढे 1965 साली जिजातमाता उद्यानाच्या दर्शनी भागात हा पुतळा हलवण्यात आला. आज येथे सातव्या राजाचा पुतळा नसला तरीही घोड्याचा एक पुतळा उभारण्यात आला आहे. तसंच काळा घोडा ही या परिसराची ओळख कायम राहिली आहे. जिजातमाता उद्यानात असलेल्या पुतळ्यावर सातवा राजकुमार संपूर्ण लष्करी लष्करी, फिल्ड मार्शलच्या, गणवेशात घोड्यावर सवार आहे. राज्याच्या बुटापासून केसापर्यंत काळ्या दगडात हा पुतळा कोरल्याने जीवंतपणा त्यात आला आहे. घोडा कधीही चालायला लागले, असा भास क्षणभर होतो.
या परिसराला काळा घोडा नाव का पडले याबाबत मात्र, मते आहेत. सातवा एडवर्ड की घोडा. त्यात लोकांच्या लक्षात घोडा राहिला. तसेच, जे ब्रिटिश आपल्यावर राज्य करतात. त्यांच्या राजाचे नाव कसे घ्यायचे, या मुद्यावरुन काळा घोडा असा उल्लेख केला गेला.