महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाने परमबीर सिंगला ठोठावला पाच हजाराचा दंड - Justice Chandiwal Commission fined Parambir Singh Rs 5,000

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. याप्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाची स्थापना करण्यात आली होती. या आयोगाने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

परमबीर सिंगला ठोठावला पाच हजाराचा दंड
परमबीर सिंगला ठोठावला पाच हजाराचा दंड

By

Published : Jun 22, 2021, 1:45 PM IST

मुंबई- माजी मुंबई पोलीस आयुक्त व राज्याचे गृह खात्याचे प्रमुख परमबीर सिंग यांना चौकशी आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर न केल्यामुळे दंड बजावण्यात आलेला आहे. परमबीर सिंग यांना चौकशी समितीचे निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

दंड मुख्यमंत्री कोविड निधीत जमा करण्याचे आदेश -

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी शंभर कोटी वसुली प्रकरणी भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. याप्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाची स्थापना करण्यात आली होती. परमबीर सिंग यांनी या चौकशी आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर न केल्यामुळे त्यांना पाच हजार रुपयांचा दंड बजावण्यात आला आहे. हा दंड मुख्यमंत्री कोविड निधीत जमा करण्याचे आदेश न्यायमूर्ती चांदीवाल यांनी दिले आहे.

हेही वाचा -शंभर कोटी वसुली प्रकरणी चांदीवाल यांच्यासमोर सचिन वाझेची नोंदवली साक्ष

ABOUT THE AUTHOR

...view details