महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Western Railway Block: पश्चिम रेल्वे लाइनवर रविवारी जंबो ब्लॉक - जंबो ब्लॉक

पश्चिम रेल्वे लाइनवर (Western Railway Line) रविवार 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत मरीन लाइन्स आणि माहीम जंक्शन स्थानका दरम्यान डाऊन स्लो मार्गांवर 5 तासांचा जंबो ब्लॉक (Jumbo Block) असणार आहे. रेल्वे ट्रॅक, सिग्नलिंग सिस्टम आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी हा ब्लॉक संचालित केला जाणार आहे.

Breaking News

By

Published : Oct 15, 2022, 4:04 PM IST

मुंबई:पश्चिम रेल्वे लाइनवर (Western Railway Line) रविवार 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत मरीन लाइन्स आणि माहीम जंक्शन स्थानका दरम्यान डाऊन स्लो मार्गांवर 5 तासांचा जंबो ब्लॉक (Jumbo Block) असणार आहे. रेल्वे ट्रॅक, सिग्नलिंग सिस्टम आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी हा ब्लॉक संचालित केला जाणार आहे.

अनेक गाड्यांचे मार्ग बदलणार: मेगा ब्लॉकच्या कालावधीत डाऊन दिशेच्या सर्व धीम्या उपनगरीय गाड्या मरीन लाइन्स आणि माहीम स्थानका दरम्यान डाऊन फास्ट मार्गांवर वळवण्यात येतील. प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे या वळवलेल्या गाड्या महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकावर थांबणार नाहीत. ब्लॉक दरम्यान वांद्रे आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान प्रवासी त्यांच्या गंतव्यस्थानाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करू शकतील. डाऊन दिशेतील सर्व धीम्या सेवा लोअर परळ आणि माहीम जंक्शनकडे वळवल्या जातील. या ब्लॉकची सविस्तर माहिती संबंधित स्टेशन मास्टर्सकडे उपलब्ध आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details