महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Uddhav Thackeray On J P Nadda : शिवसेना संपवून दाखवाच; उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान - उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान

शिवसेना पक्ष संपत आला असून देशात केवळ भाजप राहील असं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा ( J. P Nadda ) यांनी केले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांनी यावरून जोरदार हल्ला चढवला आहे. जेपी नड्डा यांचे वक्तृत्व घृणास्पद असून त्यांनी शिवसेनेला ( Shiv Sena ) संपवण्याचा प्रयत्न करून दाखवावा, असे थेट आव्हानच ठाकरे यांनी दिले.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे

By

Published : Aug 1, 2022, 5:48 PM IST

Updated : Aug 10, 2022, 12:09 PM IST

मुंबई - हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून वेगळी चूल मांडलेल्या एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या बंडानंतर शिवसेना पक्ष संपत आला असून देशात केवळ भाजप राहील असं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा ( J. P Nadda ) यांनी केले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांनी यावरून जोरदार हल्ला चढवला आहे. जेपी नड्डा यांचे वक्तृत्व घृणास्पद असून त्यांनी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करून दाखवावा, असे थेट आव्हानच ठाकरे यांनी दिले. संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्याबाबत मला अभिमान आहे असेही, ते म्हणाले. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजप सह शिंदे गटाचा समाचार -शिवसेनेच्या फायर ब्रँड, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत सध्या ईडीच्या ताब्यात आहेत. राऊत यांना न्यायालयात आज हजर करण्यापूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. राऊत यांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच, राऊत यांची पत्नी, मुलींना शिवसेना खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे असल्याचा विश्वास दिला. उद्धव ठाकरे यांनी यानंतर मातोश्रीवर जाऊन पत्रकार परिषद घेत भाजप सह शिंदे गटाचा समाचार घेतला.

हेही वाचा -Sanjay Raut to ED Custody : संजय राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी; वाचा, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद

शिवसेना संपवून दाखवाच - जे.पी नड्डा यांचं भाषण ऐकलं. ते म्हणत होते, वीस - तीस वर्षे इतर पक्षात काम करून लोक भाजपात येतात. त्यांचे कर्तृत्व शून्य आहे. आता त्यांच्याकडे काहीच आचार- विचार शिल्लक नाहीत. भाजपा सारखा लढणारा इतर कोणताच पक्ष राष्ट्रीय स्तरावर नाही. इतर पक्ष संपले नाहीत, ते इतर सर्व पक्ष संपतील असा आरोप देखील त्यांनी केला. त्यांनी केवळ देशात भाजपच टिकणार असे वक्तव्य केले. नड्डांचे वक्तव्य देशाला हुकूमशाहीकडे नेणारे आहे अशी, टीका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. महाराष्ट्रात शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे असे, विधान नड्डा यांनी केले होते. उद्धव ठाकरे यांनी यावरून, शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करूनच दाखवाच असा थेट इशारा नड्डांना दिला.

भाजपचा वंश नेमका कोणता?राष्ट्रवादी कुटुंबाचा पक्ष, काँग्रेस भाऊ बहिणीचा पक्ष अशी वंशवादाची सतत भाजप टीका करते. मात्र, इतर पक्षांमधील अनेक नेते भाजपात येत आहेत. बाहेरून लोक येत असतील तर मग भाजपचा वंश नेमका कोणता? असा सवाल उद्धव ठाकरे उपस्थित केला. देशाला हूकूमशाही राजवटीकडे नेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आज पहिल्या महायुद्धाची आठवण झाली. हिटलरच्या पद्धतीने देशात कारभार सुरू आहे. न्यायालयावर आमचा विश्वास आहे. आज चौथा स्तंभ अटकेत आहे. सध्याच्या स्थितीवर नितीन गडकरी यांनी राजकारण घृणास्पद झाल्याचे वक्तव्य केले होते. उद्धव ठाकरेंनी त्याची री ओढली. तसेच सर्वांनी प्रत्येक पातळीवर विरोध करायला हवा असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.

हेही वाचा -Hearing on Sanjay Raut Arrest : संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

Last Updated : Aug 10, 2022, 12:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details