आझाद मैदानात मोर्चेकऱ्यांना भेटण्यास पत्रकारांना परवानगी नाही, १८ मोर्चांना परवानगी
मुंबई - राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज मुंबईच्या आझाद मैदानात तब्बल 15 ते 18 मोर्चे येणार आहेत. यापैकी केवळ 5 आंदोलनकर्त्यांना आझाद मैदानात बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. याच वेळी मुस्लिम आरक्षण आणि धार्मिक दंगे भडकवणाऱ्या विरोधात कारवाईबाबत कायदा करावा, अशी मागणी घेऊन रजा अकादमी आणि वंचित बहुजन आघाडी मोर्चा काढत आहे. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र या ठिकाणी पत्रकारांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजेयकुमार जाधव यांनी..