मुंबई -राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांना पत्राचाळ जमीन घोटाळ्या प्रकरणात ईडीने ताब्यात ( Sanjay Raut in custody of ED ) घेतल्यानंतर त्यांना मुंबईतील ईडी कार्यालयात आणण्यात आले. त्यांची दिल्लीतून आलेल्या अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी सुरू आहे. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटले आहे की, मला काही दिवसापूर्वी भाजपच्या दोन नेत्यांचा फोन आला होता. भाजपमध्ये प्रवेश करा अन्यथा ईडीच्या कारवाईला समोर जावं लागणार असा मोठा खुलासा संजय राऊत यांनी प्रसार माध्यमाची बोलताना केला आहे. मात्र, ते दोन नेते कोण हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
संजय राऊतांचा मोठा खुलासा 8 तास चौकशी -आज सकाळपासून ईडीचे अधिकाऱ्यांकडून राऊत यांच्या घरी छापेमारी करण्यात आली. 8 तासाच्या चौकशीनंतर राऊत यांना दुपारी 4 वाजेच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात आणण्यात आले. सध्या ईडीच्या अधिकाऱ्यांकडून संजय राऊत यांची चौकशी सुरू असून त्यांना आज अटक करण्यात येणार असल्याची देखील दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संजय राऊत ईडीच्या ताब्यात -संजय राऊत यांच्या पत्नी यांची चौकशी सुरु झाली. राऊत यांच्या घराबाहेर पोलिसांसह सीआरपीएफचा फौजफाटा हळूहळू वाढू लागला आहे. दरम्यान शिवसेनेचे कार्यकर्तेदेखील जमू लागले होते. त्यानंतर साडेनऊ तासांनी ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे. दादर येथील गार्डन कोर्ट इमारतीतील फ्लॅटवर देखील ईडीचं सर्च ऑपरेशन सुरु आहे.
राऊतांच्या भांडुप येथील बंगल्यावर छापेमारी - ईडी अधिकाऱ्यांकडून राऊतांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया दुपारी 3.30 वाजताच्या सुरू केली होती. त्यानंतर संजय राऊतांना 3.50 च्या सुमारास ताब्यात घेण्यात आले आहे. आता ईडीचे अधिकारी बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात घेऊन जाणार आहेत. पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी रविवारी सकाळी सात वाजताच ईडीच्या 8 ते 10 अधिकाऱ्यांच्या पथकाने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील भांडुप येथील बंगल्यावर छापेमारी केली. यावेळी घरी संजय राऊत त्यांच्या पत्नी वर्षा राऊत, बंधू सुनील राऊत घरी होते. या तिघांचीही सकाळी सात वाजल्यापासूनच ईडीचे अधिकारी चौकशी करत होते. पत्राचाळ पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यांत संजय राऊत यांचे नीकटवर्तीय असलेल्या प्रवीण राऊत यांची गुरू आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीदेखील सहभागी होती. मात्र, त्यानंतर कंपनी त्या व्यवहारातून बाहेर पडली. मात्र, या व्यवहारात कंपनीला मोठा फायदा झाला होता.
11 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त -सध्या ईडीच्या अटकेत असलेल्या प्रवीण राऊत यांना या व्यवहारात मिळालेल्या पैशांतील काही पैसे त्यांनी आपले कुटुंबीय, नीकटवर्तीयांच्या खात्यात वळविले होते. यातील काही पैसे संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्याही नावे वळविण्यात आल्याचे प्रवीण राऊत यांच्या चौकशीदरम्यान बोलले गेले. तसेच याच पैशांतून वर्षा राऊत यांच्या नावे दादर येथील फ्लॅट,अलिबाग येथील किहीम येथे 8 भूखंडांची खरेदी करण्यात आल्याचा ठपका ईडीने राऊत यांच्यावर ठेवला आहे. त्या अनुषंगाने ईडीने त्यांची यापूर्वी चौकशी केली होती. वर्षा राऊत यांच्या नावे असलेला दादर येथील फ्लॅट तसेच किहीममधील 8 भूखंड अशी 11 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने यापूर्वीच जप्त केलेली आहे. या प्रकरणी राऊत यांना पुन्हा जुलै महिन्यात दोन वेळा चौकशीसाठी ईडीने समन्स जारी केले होते. मात्र, ते अनुपस्थित राहिले. त्यानंतर आता रविवारी ईडीने ही छापेमारी करत संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा -Pravin Darekar On Sanjay Raut : शिवसेना संपवण्यात राऊतांचा हात; ईडी प्रकरणावरून दरेकरांनी घेतली फिरकी