मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, आता मंत्रीपदांवरून मित्रपक्षांमध्ये संदिग्धता असण्याचे संकेत काही मित्रपक्षांच्या नेत्यांकडून मिळत आहेत. महाविकास आघाडीतील छोट्या पक्षांच्या अपेक्षा देखील वाढल्या आहेत.
मित्रपक्षांना योग्य सन्मान अन् मंत्रिमंडळात स्थान मिळावे - जोगेंद्र कवाडे - weare162
शपथविधीनंतर आता मंत्रीपदांवरून मित्रपक्षांमध्ये संदिग्धता असण्याल्याचे संकेत काही नेत्यांकडून मिळत आहेत. या आघाडीत आमचा देखील सन्मान झाला पाहिजे, असे वक्तव्य पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे आमदार जोगेंद्र कवाडे यांनी केले आहे.
मित्र पक्षांना योग्य मंत्रीपदे मिळावी; रिपब्लिक पार्टीच्या जोगेंद्र कवाडेंची इच्छा
या आघाडीत आमचा देखील सन्मान झाला पाहिजे, असे वक्तव्य पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे आमदार जोगेंद्र कवाडे यांनी केले आहे. तसेच रिपब्लिकन पक्षाला मंत्रीपद मिळण्याबाबत इच्छा त्यांनी व्यक्त केली.
विचारधारा वेगवेगळ्या असल्या, तरिही किमान समान कार्यक्रमावर एकत्र आल्याचे कवाडे यांनी सांगितले. आघाडीत एकत्र येण्यामागे आमचा एकच विचार आहे, असे ते म्हणाले.