मुंबई- जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात रविवारी (दि.5डिसेंबर)ला रात्री काही अज्ञात तरुणांनी हल्ला केला. यामध्ये विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयुशी घोषसह 28 जण जखमी झाले. तसेच संपत्तीची देखील तोडफोड झाली. यानंतर जखमींना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेएनयु विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ पोलिसांना पाचारण केले.
#JNUViolence: जेएनयूतील हिंसाचाराचे मुंबईसह देशभरात पडसाद - JNU violence
जेएनयुतील हिंसाचाराच्या घटनेनंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची निदर्शने होत असून मुंबईतही याचे पडसाद उमटले आहेत. आज सकाळी शहरातील गेट वे ऑफ इंडिया येथे विद्यार्थ्यांनी निदर्शने केली.
![#JNUViolence: जेएनयूतील हिंसाचाराचे मुंबईसह देशभरात पडसाद student agitation starts throughout country](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5609699-thumbnail-3x2-jnufinal.jpg)
जेएनयूतील हिंसाचाराचे मुंबईसह देशभरात पडसाद
या घटनेनंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची निदर्शने होत असून मुंबईतही याचे पडसाद उमटले आहेत. आज सकाळी शहरातील गेट वे ऑफ इंडिया येथे विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. विविध विद्यापीठातून आलेले विद्यार्थी याठिकाणी जमा झाले आणि घोषणाबाजी करण्यात आली. तसेच विविध संघटनांनी कँडल मार्च काढून शांततामय मार्गाने विरोध दर्शवला.
आज सकाळी शहरातील गेट वे ऑफ इंडिया येथे विद्यार्थ्यांचे निदर्शने
कोलकात्यामध्ये देखील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी मेणबत्त्या पेटवून निषेध करण्यात आला आहे.
कोलकात्यामध्ये देखील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.
Last Updated : Jan 6, 2020, 12:29 PM IST