महाराष्ट्र

maharashtra

Navratri Festival 2022 नवरात्रोत्सवासाठी जीवदानी मंदिर सज्ज !

By

Published : Sep 25, 2022, 7:31 PM IST

Updated : Sep 25, 2022, 8:07 PM IST

Navratri Festival 2022 नवरात्रोत्सवासाठी जीवदानी मंदिर सज्ज झाले असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून विरार पोलिसांचा मोठा बंदोबस्त Large deployment of Virar police आसणार आहे. कोविड 19 नंतर या वर्षी पहिल्यांदाच निर्बंधमुक्त सण साजरे Celebrate festivals without restrictions होत आहेत.

Navratri Festival 2022
Navratri Festival 2022

विरारनवरात्रोत्सवासाठी जीवदानी मंदिर सज्ज झाले असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून विरार पोलिसांचा मोठा बंदोबस्त Large deployment of Virar police आसणार आहे. कोविड 19 नंतर या वर्षी पहिल्यांदाच निर्बंधमुक्त सण साजरे Celebrate festivals without restrictions होत आहेत. त्यामुळे ९ दिवसांत ३ ते ५ लाखांवर भाविक देवीच्या दर्शनासाठी येण्याचा अंदाज देवस्थान समितीकडून वर्तविण्यात आला आहे.

यामुळे ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी दर्शन रांग व्यवस्था तसेच सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करण्यात आल्याचे मंदिरांचे मॅनेजर नितीन पाटील यांनी सांगितले आहे. विरारच्या जीवदानी डोंगरावरील जीवदानी देवी हे प्रमुख देवस्थान आहे. दररोज हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. नवरात्रोत्सव काळात भाविकांची संख्या जास्त असते. दररोज दहा ते पंधरा हजार आणि सुटीच्या दिवशी ३० ते ३५ हजार भाविक येणे अपेक्षित आहेत.

Navratri Festival 2022

स्वयंसेवक पोलिसांच्या मदतीला अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. विरार पोलिसांनी १५ पोलीस अधिकारी, आरसीपी प्लाटून, सुरक्षा दलाचे कर्मचारी, होमगार्ड असा १०० ते १२५ पोलीस बंदोबस्तासाठी तैनात ठेवणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी सांगितले आहे. या बंदोबस्त व्यतिरिक्त देवस्थानचे सुरक्षारक्षक, स्वयंसेवक पोलिसांच्या मदतीला असणार आहेत.

नवरात्रोत्सवासाठी जीवदानी मंदिर सज्ज

विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमरे मंदिराच्या पहिल्या पायरीपासून विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात आले आहेत. वाहतूक नियमनासाठी मंदिर परिसरातील स्वच्छतेलाही वेग मंदिर परिसरातील विद्युत यंत्रणा, झाडांच्या फांद्या छाटणे, विविध उपकरणांची स्वच्छता, सीसीटीव्ही यंत्रणा, पिण्याच्या पाण्याची उपाययोजना यांसह विविध गोष्टींची पूर्तता करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि दर्शन रांगेसाठी मंडप उभारणीचे काम सुरु करण्यात आले आहे.

मंदिराच्या गाभाऱ्याची स्वच्छता शिखरांना रोषणाई २६ सप्टेंबरपासून जीवदानी मंदिर नवरात्रोत्सवासाठी सज्ज होत असून, पालघर जिल्ह्यासह ठाणे, मुंबई, नवी मुंबई व इतर काही भागांतून ३ ते ५ लाखांवर भाविक विरारच्या मंदिराला भेट देतील, अशी अपेक्षा आहे. मंदिराच्या गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. मंदिर परिसर आणि शिखरांना रोषणाई करण्यात येणार आहे. रेल्वे मंदिराच्या पायथ्यापासून स्थानकापर्यंत वाहतूक पोलिसांची मदत घेत असल्याचेही मंदिर प्रशासनाने सांगितले आहे.

जीवदानी मंदिराचा इतिहासजीवदानी मंदिर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील विरार, ठाणे येथे आहे. जीवदानी मंदिर डोंगराच्या माथ्यावर बांधले आहे. भारतीय हिंदू ग्रंथांमध्येही जीवदानी मंदिराचा उल्लेख आहे. भारतीय पुराणानुसार हे मंदिर खूप जुने आहे आणि हे मंदिर पांडवांनी बांधले होते. पांडवांना वनवासात पाठवल्यावर ते वनवास कापण्यासाठी गेले आणि त्यांनी वीर गुहेत आश्रय घेतला. सर्व पांडवांनी वीरा गुहेत मातेचे मंदिर बांधायचे ठरवले होते. पांडवांनी वीरा गुहेवर मंदिर बांधले होते.

भक्ताच्या सर्व मनोकामना जीवदानी जीवदानी मातेची मूर्तीही पांडवांनी मंदिरात बसवली होती. तेथे पाच पांडवांनी मातेची पूजा केली. पांडवांनी पांडव डुंगरी नावाच्या ठिकाणी हे मंदिर बांधले होते आणि त्यांना शक्ती देण्यासाठी आईची प्रार्थना केली होती. पांडवांच्या नंतर हे स्थान संत, योगी, ऋषींचे निवासस्थान बनले होते. जेथे अनेक संतांनी तपश्चर्या केली. या ठिकाणी जीवदानी देवीची अपार कृपा आहे. जीवदानी मातेच्या मंदिरात जाऊन मस्तक नतमस्तक करणाऱ्या भक्ताच्या सर्व मनोकामना जीवदानी माता पूर्ण करते. भारतीय लोकांची श्रद्धा जीवदानी देवीच्या मंदिराशी जोडलेली आहे.

बांधकामाचा पाया 17 व्या शतकात पांडवांनी घातलादरवर्षी लोक देवी जीवदानी मातेच्या दर्शनासाठी जातात आणि त्यांच्या जीवनात आनंद मिळवतात. मंदिराच्या बांधकामाचा पाया 17 व्या शतकात पांडवांनी घातला होता. मंदिराच्या आत अनेक पाण्याच्या टाक्या पांडवांनी बांधल्या होत्या. प्राचीन काळापासून आजतागायत जीवदानी देवीच्या मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. जीवदानी मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना या मंदिराच्या सुमारे 1300 पायऱ्या चढून जावे लागते. जीवदानी मातेचे दर्शन घेण्यासाठी जो भक्त १३०० पायऱ्या चढुन जावे लागते.

Last Updated : Sep 25, 2022, 8:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details