मुंबई - कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री पाटील यांचा दणदणीत विजय झाल्यानंतर राज्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना हिमालय जाण्याच्या वक्तव्यावरून ( Chandrakant Patil Statement ) टार्गेट केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यावर कोटी करत, दादा पद्धती या अशा शब्दात निशाणा साधला आहे.
चंद्रकांत पाटलांच्या हिमालयात जाण्याच्या वक्त्यांवरून जितेंद्र आव्हाडांची कोटी - चंद्रकांत पाटील यांच्यावर कोटी
चंद्रकांत पाटील यांनी निवडणुक प्रचारावेळी आपलं चॅलेंज आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही मतदार संघाचा राजीनामा देऊन पोटनिवडणूक लावायची. निवडून नाही आलो, तर सरळ राजकारण सोडून संन्यास घेईल आणि हिमालयात निघून जाईल, असे विधान केले होते. हिमालयात जाण्याच्या वक्तव्याची टिंगल उडवली जात आहे.
हिमालयात जाणार -कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण पेटले होते. हा मतदार संघ जिंकण्यासाठी भाजपने ताकद पणाला लावली होती. मूळचे कोल्हापूरचे असलेले चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक जाहीर झाल्यापासून कोल्हापुरात ठाण मांडले होते. चंद्रकांत पाटील यांनी निवडणुक प्रचारावेळी आपलं चॅलेंज आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही मतदार संघाचा राजीनामा देऊन पोटनिवडणूक लावायची. निवडून नाही आलो, तर सरळ राजकारण सोडून संन्यास घेईल आणि हिमालयात निघून जाईल, असे विधान केले होते.
नका परत या! -पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि काँग्रेसकडून चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून डिवचले आहे. जितेंद्र आव्हाड यांनीही या वरून पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा हा विजय आहे. कोल्हापूरची जागा जिंकली... शाहू महाराज की जय, असे सांगत मिम्स ट्विटर पोस्ट केला आहे. त्यामध्ये मी पोहचलो रे हिमालयात, असा फोटो असून त्यावर नको परत या, असे नमूद केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी यावरून खुलासा केला आहे. मात्र राज्यातील सर्वस्तरातून पाटील यांच्या हिमालयात जाण्याच्या वक्तव्याची टिंगल उडवली जात आहे.