मुंबई -उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने मनी लाँडरींगचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र ज्या आधारावर मुंबई उच्च न्यायालयाने हे आदेश दिले होते, त्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने घोटाळ्याप्रकरणी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये शरद पवार यांचे नावच नसल्याचा धक्कादायक खुलासा राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
हेही वाचा... 'शरद पवारांना शिवाजी महाराजांच्या नखांची तर सर आहे का'