मुंबई- जिया खान आत्महत्या प्रकरणातील एक घडामोड समोर आली आहे. या आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे. त्यामुळे आदित्य पांचोली याचा पुत्र सुरज पांचोली यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणातला मुख्य आरोपी सुरज पांचोली आहे. सुरज पांचोली हा जिया खानचा बॉयफ्रेंड होता. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे होता. मात्र आता हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे थंड झालेलं हे प्रकरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
सुरज पांचोलीने केले स्वागत-
सुरज पांचोली यांचे वकील प्रशांत पाटील यांचे असे म्हणणं आहे की, या प्रकरणातील आरोपी सुरज पांचोली यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. सेशन कोर्टाने हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द केल्यामुळे याचे आम्ही स्वागत करतो. आम्ही पहिल्या दिवसापासून हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे, अशी मागणी करत होतो. तसे निवेदनेही आम्ही सादर केलेली आहेत. त्यामुळे आत्ता सेशन कोर्टाने दिलेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतोय.
वकील प्रशांत पाटील पुढे असे म्हणाले की, जियाचे आत्महत्या प्रकरण मागच्या काही वर्षांपासून प्रलंबित होते, आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका देखील सादर केली होती. ज्यामुळे हे प्रकरण सहा महिन्याच्या आत निकाली लागेल. मात्र आता हे प्रकरण सीबीआयकडे दिल्यामुळे लवकरात लवकर या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेल.