मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरिवली येथे दिवसाढवळ्या घरात घुसून सोने चांदीच्या दागिन्यांची बॅग लंपास करणाऱ्या महिला चोरास बोरिवली पोलिसांनी अटक केली Jewellery Bag thief woman arrested आहे. मुंबईच्या कुर्ला परिसरातून आरोपी महिलेस अटक करण्यात आली असून तिच्याकडून आठ लाख 35 हजार किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत Stolen jewellery seized करण्यात बोरिवली पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव शितल उपाध्याय वय ३६ वर्षे असून तिच्यावर मुंबईच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये चोरीचे गुन्हे case registered against woman for jewellery theft नोंद आहे.
दागिन्यांच्या बॅगची शिताफीने चोरी -बोरिवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही दिवसा रेकी करायची आणि घरातील व्यक्तींची नजर चुकवून घरातील मौल्यवान व किमती ऐवज लंपास करत असे. बोरिवली पोलीस स्टेशन हद्दीतील साईबाबा नगर येथील दीप सोसायटीतील एक विदेशी महिला आपल्या आईकडे राहण्यासाठी आली असता 24 सप्टेंबरच्या दिवशी फिर्यादी महिला शॉपिंग करण्यासाठी बाहेर गेल्यानंतर फिर्यादीची आई घराचा दरवाजा उघडा ठेवूनच घरात झोपली होती. याच दरम्यान आरोपी महिलेने घरात घुसून सोने-चांदीच्या दागिन्यांची बॅग घेऊन आरोपी महिला फरार झाली.