मुंबई -आर्थिक डबघाईला आलेल्या जेट एअरवेजच्या बाबत अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नसल्याने सोमवारपासून जेटच्या ११०० वैमानिकांनी विमान न उडविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आज मुंबईत जेट एअरवेज व एसबीआय यांच्यात महत्त्वाची बैठक होत आहे. त्यामुळे वैमानिकांनी आपले आंदोलन तूर्तास मागे घेतले आहे. मुंबईतील अंधेरी परिसरातील जेट एअरवेज कार्यालयाबाहेर शेकडो जेट एअरवेजचे कर्मचारी जमले आहेत.
'जेट'च्या ११०० कर्मचाऱ्यांचे आज कामबंद आंदोलन, दिवसभरात ७ विमानांचे उड्डाण - विमान
आज मुंबईत जेट एअरवेज व एसबीआय यांच्यात महत्त्वाची बैठक होत आहे. त्यामुळे वैमानिकांनी आपले आंदोलन तूर्तास मागे घेतले आहे.
संग्रहीत छायाचित्र
जेट एअरवेजच्या अभियंता, पायलट व इतर कर्मचाऱ्यांना जानेवारी २०१९ पासून मासिक वेतन मिळालेले नाही. त्यामुळे 'नॅशनल एविटर्स गिल्ड'ने या संदर्भात 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली आहे. आर्थिक डबघाईला आलेल्या जेट एअरवेजच्या बाबत अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. यामुळे आज दिवसभरात जेट एअरवेजची केवळ ७ विमाने उडाली आहेत.
Last Updated : Apr 15, 2019, 2:29 PM IST