मुंबई - नॅशनल टेस्टिंग एजन्सी ( National Testing Agency )कडून दिलेल्या माहिती नुसार (JEE Main 2022)चा आज संध्याकाळपर्यंत कधीही जहीर केला जाईल असे, सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी आपला अर्ज क्रमांक नोंदवून त्याची खात्री झाल्यावर ओटीपी आल्यानंतर विद्यार्थ्यांना जेईई जॉईंटइन्ट्रान्स एक्झाम मेन परीक्षाचा निकाल दिसू शकेल, असेही राष्ट्रीय चाचणी संस्थे सांगितले आहे.
देशभरातील निकाल जाहीर केला जाणार - देशभर झालेल्या (JEE)मेन या परीक्षांचा निकाल आज लागण्याची उत्कंठा विद्यार्थ्यांमध्ये होती. आज संध्याकाळपर्यंत राष्ट्रीय चाचणी एजन्सी यांच्याद्वारे जेईच्या संदर्भातला देशभरातील निकाल जाहीर केला जाणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी कृपया JEE कडून या संपूर्ण प्रक्रिये संदर्भात विविध शुल्क त्या संदर्भाच्या तारखा त्या संदर्भाचे कागदपत्रे याबद्दलच्या सूचनांची विद्यार्थ्यांनी प्रतीक्षा करावी, असही यामध्ये सांगण्यात आले आहे.