महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Silver Oak Attack : जयश्री पाटील यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या निकाल - आरोपी वकील गुणरत्न सदावर्ते

शरद पवार यांच्या ( Ncp Sharad Pawar ) निवासस्थानी आठ एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्याप्रकरणी ( Silver Oak Attack ) जयश्री पाटील आरोपी असून मागील सुनावणीदरम्यान त्यांना अटकेपासून ( Jayashree Patil's pre-arrest bail ) अंतरिम दिलासा देण्यात आला होता.

Silver Oak Attack
Silver Oak Attack

By

Published : Apr 29, 2022, 7:35 PM IST

मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Ncp Sharad Pawar ) यांच्या (Sharad Pawar attack on residence ) निवासस्थानी झालेल्या हल्ला ( Silver Oak Attack ) प्रकरणातील आरोपी जयश्री पाटील यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai sessions Court) सुनावणी पूर्ण झाली आहे. कोर्टाने निकाल राखीव ठेवला आहे. उद्या शनिवार रोजी दुपारी तीन वाजता निकाल जाहीर करणार आहे. जयश्री पाटील यांना ( Jayashree Patil's pre-arrest bail ) न्यायालयाचा दिलासा मिळतो की अटक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जयश्री पाटील यांची प्रतिक्रिया

शरद पवार यांच्या ( Ncp Sharad Pawar ) निवासस्थानी आठ एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्याप्रकरणी ( Silver Oak Attack ) जयश्री पाटील आरोपी असून मागील सुनावणीदरम्यान त्यांना अटकेपासून ( Jayashree Patil's pre-arrest bail ) अंतरिम दिलासा देण्यात आला होता. आज त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण झाला असून उद्या निकाल येणार आहे. या प्रकरणातील 111 आरोपींसह आरोपी वकील गुणरत्न सदावर्ते यांना देखील मुंबई सत्र न्यायालयाने मागील सुनावणीदरम्यान जामीन मंजूर केला होता. त्यानंतर ते सर्व आरोपी जामिनावर सुटले आहे.

बिल्डींगमध्ये झाली महत्वाची बैठक
जयश्री पाटील यांच्या याचिकेवर आज सुनावणीदरम्यान सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटले की, सात एप्रिल रोजी सदावर्ते यांच्या बिल्डिंगच्या छतावर मध्यरात्री एक महत्वाची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये आठ तारखेला शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ला करण्यासंदर्भातील नियोजन करण्यात आले होते. सदावर्ते यांनी अनेकदा सांगितले आहे की, मी एसटी कामगारांच्या केससाठी मी फी घेतील नाही. मात्र, तपासात असे समोर आले की एसटी कामगारांकडून प्रत्येकी तीनशे रुपये जमा करण्यात आले होते. आणि ते पैसे जयश्री पाटील यांच्याकडे देण्यात आले होते. त्यामुळे जयश्री पाटील यांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात येऊ नये असे प्रदीप घरत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -Gunratna Sadavarte : कट रचून गुणरत्न सदावर्ते यांना फसवण्याचा प्रयत्न - जयश्री पाटील

माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास- जयश्री पाटील
आज झालेल्या युक्तिवादानंतर उद्याला जयश्री पाटील यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालय निकाल देणार आहे. युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर जयश्री पाटील यांनी माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली आहे.

काय आहे प्रकरण
8 एप्रिलला दुपारी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते. यावेळी जमाव आक्रमक होऊन पवार यांच्या घरावर दगड, चप्पल फेकही केली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते आणि इतर 115 एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती. न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तर इतर कर्मचाऱ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या प्रकरणातील 111 आरोपींना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केली.
हेही वाचा -वकील गुणरत्न सदावर्ते यांचा अटकपूर्व जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी नागपूर खंडपीठात याचिका

ABOUT THE AUTHOR

...view details