महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Jayant Patil on bipin rawat death : 'हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त होत असेल तर, संरक्षण व्यवस्थेवर प्रश्न उभे राहतात' - जयंत पाटील पत्रकार परिषद

नुकतेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी (Shivsena MLA Sanjay Raut) बीजेपीवर केलेली टीका, आणि आशिष शेलार - महापौर किशोरी पेडणेकर (Ashish Shelar - Pednekar Controversy) यांच्यात वाद झाले. या निमित्ताने राजकीय लोकांनी सांभाळून भाषा वापरण्याचा सल्ला जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिला.

Jayant Patil
Jayant Patil

By

Published : Dec 10, 2021, 7:52 PM IST

मुंबई -देशाचे पहिले सीडीएस बिपिन रावत (CDS Bipin Rawat) हे कार्यक्रमाला जाण्यासाठी वापरणारे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त होते. ही चिंतेची बाब आहे. देशाच्या संरक्षण विभागातील एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याच्या सुरक्षेत गलथानपणा असेल. तर, देशाच्या सुरक्षेत हलगर्जीपणा होतोय का? देशाच्या संरक्षण व्यवस्थेवर प्रश्न उभे राहणे साहजिक आहे. असा प्रश्न राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उपस्थित केला आहे.

जयंत पाटील यांची पत्रकार परिषद

या अपघाताला घातपात म्हणणं योग्य नाही. प्रकरणाची पूर्ण माहिती समोर येण्याआधीच शंका व्यक्त करणं योग्य नसून सीडीएस बिपिन रावत यांच्या अपघाताची चौकशी सुरू झाली आहे. या चौकशीतून नक्कीच सत्य समोर येईल, असे मत जयंत पाटील यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

राजकीय लोकांनी सांभाळून बोलावे
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी (Shivsena MLA Sanjay Raut) भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर टीका करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला. तसेच आशिष शेलार यांनीही मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्याबाबत वापरलेल्या शब्दामुळे तो विवाद निर्माण झाला. ते पाहून राजकीय लोकांनी सांभाळून भाषा वापरावी असा सल्ला जयंत पाटील यांनी दिला. व्यक्तिगत पातळीवर जाऊन कोणीही कोणावर टीका टिप्पणी करू नये. राजकारणात कोणीही कोणाबद्दल आरोप करणं आणि त्या आरोपांना प्रसिद्धी मिळणे ही अनिष्ट प्रथा पडत असल्याची खंतही यावेळी त्यांनी व्यक्त केली.

मालिकांनी मागितली कोर्टाची माफी
कोर्टाच्या आदेशानंतर ही अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minority Minister Nawab Malik) यांनी ज्ञानदेव वानखडेंबद्दल अनावधानाने वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याबाबत नवाब मलिक यांनी कोर्टाची माफी मागितली आहे. याचा अर्थ त्यांनी याआधी केलेले वक्तव्य मागे घेतली असा होत नाही. तसेच नवाब मलिक यांनी कोर्टाची माफी मागितली आहे. ज्ञानदेव वानखेडे यांची नाही असेही स्पष्टीकरण जयंत पाटील यांच्याकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा -'शरद पवारांच्या वाढदिवशी 'व्हर्च्युअल रॅली' द्वारे शुभेच्छा द्या' - जयंत पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details