महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यपालांनी एवढा वेळ लावण्याची आवश्यकता नाही, जयंत पाटील यांचा राज्यपालांना चिमटा - जयंत पाटील यांच्याबद्दल बातमी

जाज्यपालांनी एवढा वेळी 12 सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी लावण्याची आवश्यक्ता नाही अशी टीका जयंत पाटील यांनी केली. राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यांकडे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोपवण्यात आली होती.

Jayant Patil has criticized the governor for not taking so much time to appoint MLAs
राज्यपालांनी एवढा वेळ लावण्याची आवश्यकता नाही, जयंत पाटील यांचा राज्यपालांना चिमटा

By

Published : Jan 23, 2021, 7:10 PM IST

मुंबई -महाविकास आघाडी कडून विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावांची शिफारस करण्यात आली असून अद्याप त्यावर राज्यपालांनी निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्यपालांनी विधान परिषद सदस्य नियुक्ती संदर्भात एवढा वेळ लावण्याची आवश्यकता नसल्याचे म्हणत जयंत पाटील यांनी राज्यपालांना डिवचले.

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाविकास आघाडीची राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यांकडे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोपवण्यात आली होती. मात्र, अद्याप या यादीवर राज्यपालांकडून स्वाक्षरी झालेली नाही. या यादीवर स्वाक्षरी करण्याचा अधिकार पूर्णतः राज्यपालांचा आहे. मात्र, असे असले तरी स्वाक्षरी करायला एवढा वेळ लागायला नको होता. असे म्हणत आपल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी राज्यपालांना चिमटा काढला.

ABOUT THE AUTHOR

...view details