मुंबई - वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा. मात्र, विचारसरणी नथुराम गोडसेची अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर पाटील यांनी ट्वीट करत राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (2014)ला मोदींना पाठिंबा दिला, (2019)ला मोदींना विरोध आणि आता पुन्हा मोदींची पालखी खांद्यावर अशा शब्दांत पाटील यांनी राज यांच्यावर टीका केली आहे.
राजकीय पक्षांनी लक्ष्य केले होते - मशिदींवरील भोंग्यांचा त्रास संपूर्ण देशाला होत आहे. येत्या ३ मे रोजी ईद आहे. या तारखेपर्यंत सरकारने मौलवींशी चर्चा करून भोंगे उतरवावेत. अन्यथा, मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू असा निर्वाणीचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (दि. 12 एप्रिल)रोजी झालेल्या ठाण्यातील सभेत राज्य सरकारला दिला. शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणावरून राज यांना राजकीय पक्षांनी लक्ष्य केले होते. त्यावर राज यांनी ठाण्यात 'उत्तर सभा' घेतली.