महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'ऑक्सिजनजन्य साहित्यावरील जीएसटी हटवा' - जयंत पाटील य

ऑक्सिजन आणि ऑक्सिजनजन्य साहित्यावर जीएसटी लावला जात असून हा जीएसटी हटवण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अर्थमंत्रालयाकडे केली आहे.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील
जलसंपदा मंत्री जयंत पाटील

By

Published : May 8, 2021, 10:09 PM IST

मुंबई -ऑक्सिजन आणि ऑक्सिजनजन्य साहित्यावर जीएसटी लावला जात असून हा जीएसटी हटवण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अर्थमंत्रालयाकडे केली आहे.

ऑक्सिजनजन्य साहित्यावरील जीएसटी हटवा, जयंत पाटील यांची मागणी

'जीएसटी हटवण्याची मागणी'

'द असोसिऐटेड चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया' या संस्थेने अर्थमंत्रालयाकडे पत्रव्यवहार करून जीएसटी कमी करण्याची मागणी केली आहे. त्याच पत्राचा आधार घेत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कोरोनाच्या संकटात भारतात औषध आणि आरोग्याशी संबंधित उपकरणांची कमतरता भासत आहे, अशावेळी ऑक्सिजन आणि ऑक्सिजनजन्य साहित्यावरील जीएसटी हटवण्याची मागणी केली आहे. हा जीएसटी हटवल्यास आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण थोड्याप्रमाणात कमी होईल असे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा -मराठा आरक्षणासाठी निवृत्त न्यायमूर्तींची समिती

ABOUT THE AUTHOR

...view details