मुंबई - आतापर्यंत भाजपच्या नेत्यांनी राज्यातील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार पाडण्याच्या पाच-सहा वेळा वेगवेगळ्या तारखा दिल्या आहेत. लोकांना आशेवर ठेवणं ही त्यांची जबाबदारी आहे, हे मी समजू शकतो. गेली दोन वर्ष विरोधक आघाडी सरकार जाण्याच्या वेगवेगळ्या तारखा देत आहेत, मात्र नारायण राणे यांनी मार्च ही जास्तच मुदत दिली त्याबद्दल नारायण राणे (Narayan Rane) यांचे आभार, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे.
नारायण राणे (Narayan Rane) यांनी आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) मार्चपर्यंत जाणार असे भाकीत केले आहे. त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्या भाकिताची खिल्ली उडवली आहे. तसेच त्यांचा पक्ष टिकवायचा असेल तर अशी आश्वासने व असं वातावरण कायम ठेवावं लागतं, अशी टीकाही जयंत पाटील यांनी यावेळी केली.
हे ही वाचा -Narayan Rane : मार्चमध्ये महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन होणार - केंद्रीय मंत्री नारायण राणे
काय म्हणाले नारायण राणे ?
राज्यात अनागोंदी कारभार आहे. भाजपचं सरकार नाही त्यामुळे असं होत आहे. मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार आहे. तेव्हा तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. राज्यातील मविआ सरकार (Maha Vikas Aghadi) फार काळ टिकणार नाही, असं राणे म्हणाले. त्याचबरोबर माझ्या मनात काही गोष्टी आहेत. त्या आताच सांगणार नाही. सरकार पाडायचं असेल किंवा नवं सरकार आणण्यासाठी काही करायचं असेल तर अशा गोष्टी उघड बोलायच्या नसतात, असं सूचक विधानही त्यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी आहेत. आजारी माणसाचं नाव घेऊन काही बोलणं योग्य नाही. पण आघाडी सरकारचं लाईफ अधिक नाही, असंही ते म्हणाले.
हे ही वाचा -‘त्या’ कोंबड्यांसाठीच सरकार बनवण्याचे भाकीत; नवाब मलिकांचा नारायण राणेंवर पलटवार
घोडेबाजार होऊ नये म्हणून निवडणुका बिनविरोध -
विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी सर्वच पक्ष सकारात्मक आहेत. या निवडणुकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होतो. तो घोडेबाजार होऊ नये यासाठी कायद्यातही आपल्याला बदल करावे लागतील. मात्र सर्वच पक्ष या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी सकारात्मक असल्याने बिनविरोध निवडणुका होत आहे. तसेच बिनविरोध निवडणुका झाल्याने अनावश्यक खर्च टळतो. यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला देखील निवडणुकीत भाग घेणे शक्य होते.