मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर 30 जूनला महाविकास आघाडी सरकार विश्वासदर्शक ( Jayant Patil on Uddhav Thackeray resignation ) ठरावाला सामोरे जाईल असे वाटत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray resigns as cm ) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधत आपला राजीनामा दिला. यावर उद्धव ठाकरे दीर्घकाळ महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात राहतील. एक चांगले सरकार, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातले सरकार म्हणून महाविकास आघाडी सरकार काम करत होते. कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामामुळे देशभरात मुख्यमंत्री कसे काम करू शकतात याचा आदर्श त्यांनी समोर ठेवला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil NCP ) यांनी दिली.
हेही वाचा -Sworn in ceremony : देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांचा 1 जुलैला होणार शपथविधी, सुत्रांची माहिती
संख्याबळ नसल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले असले तरी दीर्घकाळ ते लोकांच्या मनात मुख्यमंत्री म्हणून राहतील, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत काढले. तसेच, काल मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधल्यानंतर राजीनामा देतील याबाबतची कल्पना शरद पवार यांना नव्हती, असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर शरद पवार यांच्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.