मुंबई -उद्धव ठाकरे यांना आवश्यक ती मदत करण्याची राष्ट्रवादीची भूमिका आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले शिवसेनेचे विधानसभेचे आमदार परत येतील, असा असा आम्हाला विश्वास आहे. आमदार आल्यावर चित्र अधिक स्पष्ट होईल. महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत असल्यामुळे त्यांना पूर्णपणाने या महाविकास आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी आमचा यापूर्वी पाठिंबा आहे आणि आताही त्याला पूर्ण पाठिंबा राहणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.
शिवसेनेतील परिस्थितीवर भाष्य करणे उचित नाही. त्यांचे काय झाले याची माहिती मला नाही. मात्र शरद पवार यांच्या समवेत मी आणि सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यांना या संकटातून आवश्यक असेल ते सहाय्य करण्याची भूमिकाही व्यक्त केली. त्याचबरोबर आवश्यक असणारे प्रयत्न त्यांच्याकडून व्हावेत याचा आढावा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्याबरोबर सक्षमपणाने हे सरकार वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करेल, असा आमचा विश्वास असल्याचेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
ठाकरे साहेबांच्या बरोबर राहावे आणि त्यांना सरकारी करण्यासाठी प्रयत्न करावेत त्यांनी प्रयत्न करावेत आणि त्यांना आवश्यक ती मदत करावी ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. येणाऱ्या काळामध्ये पुढच्या काही दिवसात ती महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले शिवसेनेचे विधानसभेचे सदस्य आमदार परत येतील. त्यावेळी आपल्या स्वतःच्या पक्षात कार्यरत राहतील असा आम्हाला विश्वास आहे. ते परत आल्यावर चित्र अधिक स्पष्ट होईल आणि महा विकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत असल्यामुळे त्यांना पूर्णपणाने या महा विकास आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी आमचा यापूर्वी पाठिंबा आहे आणि आताही त्याला पूर्ण पाठिंबा राहील.
शरद पवारांनी जनतेच्या मनातला निर्णय घेतला -आजची राजकीय परिस्थिती पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणीस यांच्या सोबत जाऊन पहाटेचा शपथ विधी पार पाडला होता. याला समर्थन दिले असते तर, अशी परिस्थिती आली नसती, असे प्रश्न प्रसारमाध्यमांनी जयंत पाटील यांना विचारले. त्यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्या वेळी जनतेच्या मनातला निर्णय घेतला असल्याचे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिले.