मुंबई -डिसेंबर महिन्यामध्ये थंडीचा वातावरण असतो. मात्र सध्या या वातावरामध्ये पावसाने हजेरी लावल्याने स्वेटर घालून छत्रीचा वापर करायचा का? असा प्रश्न सध्या राज्यातील जनतेला पडला आहे. कारण एकीकडे रिमझिम पडणारा पाऊस तर दुसरीकडे अंगाला टोचणारी बोचरी थंडी यामुळे काय करावे, हेच सध्या मुंबईकरांना कळत नाही आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने ( Rainfall in Many Districts of the State ) झोडपून काढले. पूर्व किनारपट्टीलाही 'जवाद' चक्रीवादळाचा इशारा ( Jawad Cyclone Warning For Maharashtra ) देण्यात आला आहे. त्यामुळे भारताच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही किनारपट्ट्यांवर सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. भारतीय हवामान खात्याने ( Indian Meteorological Department ) चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. शनिवारी हे वादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. मान्सून संपल्यानंतर हे पहिलेच चक्रीवादळ आहे. उद्या (शुक्रवारी) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ ( Bay of Bengal Central ) निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
- जोरदार पावसाची हजेरी
बंगालच्या उपसागरमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहेत. हे कमी दाबाचे क्षेत्र लवकरच जवाद चक्रीवादळाचे रूप धारण करेल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. यावेळी हवेचा वेग हा 45 ते 55 किमी प्रती तास इतका आहे. शुक्रवारी हवेचा वेग 65 किमी प्रती तास इतका असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सौदी अरेबियाने जवाद हे नाव दिले आहे. जमिनीला धडकल्यानंतर त्याचा वेग 80 ते 90 किमी प्रती तास इतका असेल. याच पार्श्वभूमीवर 3 आणि ४ डिसेंबर रोजी या मार्गांवरून जाणाऱ्या ९५ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. बदललेल्या वातावरणामुळे बंगाल, आंध्र प्रदेश, ओडिशा या राज्यांमध्ये सतत मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. मुंबईत बुधवारी आणि गुरुवारी पावसाने हजेरी लावली होती. पुढील दोन दिवस देखील जोरदार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज नाही हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या नोंदींनुसार बुधवारी सांताक्रूझ येथे २८.६ मिमी, कुलाबा येथे २७.६ मिमी, डहाणू येथे ११.६ मिमी, ठाणे येथे २७.२ मिमी पाऊस पडला. बुधवारची ही पावसाची रीपरीप गुरुवारीही सुरुच राहिल्याचे चित्र दिसत आहे. याशिवाय गुजरात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.
- 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता