मुंबई - प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुविधेसाठी दैनिक जनशताब्दी एक्स्प्रेस 14 फेब्रुवारी 2021पासून दररोज चालण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई ते जालना प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जनशताब्दी एक्स्प्रेसचा वेळ
गाडी क्रमांक 02271 जनशताब्दी विशेष एक्स्प्रेस 14 फेब्रुवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून दररोज दुपारी 12 वाजून 10 मिनिटाने सुटेल. तर, जालना येथे त्याच दिवशी सायंकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी पोहोचले. तर गाडी क्रमांक 02272 जनशताब्दी विशेष एक्स्प्रेस रविवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत जालना येथून दररोज सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी सुटेल. तर, सीएसटी येथे त्या दिवशी दुपारी 4 वाजून 20 मिनिटांनी पोहोचेल.