मुंबई -मुंबई ते मडगाव दरम्यान धावणारी जनशताब्दी एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. मध्य रेल्वेने पुढील आदेश येईपर्यंत 10 फेब्रुवारी 2021 पासून आठवड्यातून पांच दिवस चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई ते मडगाव दरम्यान जनशताब्दी विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्रमांक 01151 जनशताब्दी सुपरफास्ट एक्सप्रेस 10 फेब्रुवारी 2021 पासून रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शनिवारी असे आठवड्यातून 5 दिवस धावणार आहेत. तर जनशताब्दी सुपरफास्ट एक्सप्रेस मंगळवारी आणि शुक्रवारी धावणार नाही आहे.
हेही वाचा-एलआयसीचा आयपीओ दिवाळीत खुला होणार
असे आहे वेळापत्रक-
जनशताब्दी सुपरफास्ट एक्सप्रेस पहाटे 5 वाजून 25 मिनिटांनी दादर येथून सुटणार आहे. त्याच दिवशी मडगावला दुपारी 2 वाजून 25 मिनिटांनी पोहोचणार आहे. तर मुंबईसाठी जनशताब्दी सुपरफास्ट एक्सप्रेस मडगावलावरून दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी सुटणार आहे. तर, त्याच दिवशी रात्री 11 वाजून 15 मिनिटांनी दादरला पोहोचणार आहे.
हेही वाचा-सेबीकडून किशोर बियानीसह त्यांचे बंधु अनिल यांच्यावर एका वर्षाची बंदी
जनशताब्दी एक्सप्रेसचे थांबे-
जनशताब्दी सुपरफास्ट एक्सप्रेस ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि येथे थांबे देण्यात आले आहेत. तसेच या गाडीची संरचना एक व्हिस्टाडोम कोच, दोन एसी चेअर कार आणि 12 द्वितीय श्रेणी आसन आहेत. केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येणार आहे. प्रवाशांनी बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड -१९ संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांनी केली आहे.