महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 13, 2022, 3:31 PM IST

Updated : Apr 13, 2022, 4:21 PM IST

ETV Bharat / city

Sharad Pawar : पुरंदरेंच्या माहितीवरून जेम्स लेनने आक्षेपार्ह लिखाण केले : शरद पवारांचे राज ठाकरेंना प्रत्त्युत्तर

महाराष्ट्रात राष्ट्रवादीनेच जातीयवाद पसरवला. बाबासाहेब पुरंदरेंमुळे शिवराय घराघरात पोहोचले, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होत. त्यावर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरेंना प्रत्त्युत्तर दिले ( Sharad Pawar Reply To Raj Thackeray ) आहे. पुरंदरेंच्या माहितीवरून जेम्स लेनने आक्षेपार्ह लिखाण ( James Laine Babasaheb Purandare Controvercy ) केले, असा दावा पवारांनी केला आहे.

शरद पवार
शरद पवार

मुंबई : जेम्स लेन याने छत्रपती शिवाजी महाराज ( James Laine On Shivaji Maharaj ) यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण हे बाबासाहेब पुरंदरे यांच्या माहितीवरून लिहिलं होतं. त्याने लिहिलेल्या पुस्तकात पुरंदरे यांच्या नावाचा उल्लेख करून ही माहिती त्यांच्याकडून घेतली असल्याचे जेम्स लेन याने ( James Lane Babasaheb Purandare Controvercy ) सांगितले. त्यामुळेच आपण बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर याबाबत टीका केली होती. या लिखाणाबाबत बाबासाहेब पुरंदरे यांनी देखील कधीही खुलासा केलेला नाही. त्यामुळेच टीकेबाबत आपल्याला कधीही दुःख झालं नाही. उलट त्याचा आपल्याला अभिमानच आहे, असा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जातीयवाद वाढवल्याची टीका केली होती. त्यावर पवारांनी प्रत्त्युत्तर ( Sharad Pawar Reply To Raj Thackeray ) दिले.


राजमाता जिजामाईंनी शिवरायांना घडवलं : यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यक्तिमत्व घडवण्याचं काम दादोजी कोंडदेव यांनी केलं असल्याचा उल्लेख बाबासाहेब पुरंदरे यांनी केला. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व हे राजमाता जिजामाई यांनी घडवलं. मोठ्या कष्टानं राजमाता जिजाबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व उभं केलं, असे शरद पवार यांनी म्हटले ( Sharad Pawar On Dadoji Konddeo ) आहे.

Last Updated : Apr 13, 2022, 4:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details