महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

shoib khatib on yakub memon grave controversy याकूब मेमनला सहानुभूती नाहीचं, जामा मस्जिद ट्रस्ट अध्यक्ष शोयब खतीबांचा खुलासा - याकूब मेमनला सहानुभूती नाही

मुंबई बॉम्बस्फोटातील (1993 mumbai blasts) मुख्य आरोपी याकूब मेमनच्या (yakub memon grave controversy) कबरीचा वाद उफाळून आला आहे. राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच जामा मस्जिद ऑफ बाॅम्बे ट्रस्टचे (Jama Masjid Trust) चेअरमन शोयब खतीब (Shoaib Khatib) यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. चुकीच्या पद्धतीने बातम्या प्रसिद्ध होत आहेत. मेमनने देशाचे मोठं नुकसान केले आहे. त्याला कदापि सहानुभूती दिली जाणार (Memon has no sympathy)नाही. मात्र, कोविडमुळे बडी रात झाली नव्हती, त्यामुळे लायटिंग करण्यात आली होती, असे खतीब म्हणाले.

shoib khatib on yakub memon grave controversy
याकूब मेमनला सहानुभूती नाहीचं, जामा मस्जिद ट्रस्ट अध्यक्ष शोयब खतीबांचा खुलासा

By

Published : Sep 8, 2022, 4:55 PM IST

मुंबई मुंबई बॉम्बस्फोटातील (1993 mumbai blasts) मुख्य आरोपी याकूब मेमनच्या (yakub memon grave controversy) कबरीचा वाद उफाळून आला आहे. राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच जामा मस्जिद ऑफ बाॅम्बे ट्रस्टचे (Jama Masjid Trust) चेअरमन शोयब खतीब (Shoaib Khatib) यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. चुकीच्या पद्धतीने बातम्या प्रसिद्ध होत आहेत. मेमनने देशाचे मोठं नुकसान केले आहे. त्याला कदापि सहानुभूती दिली जाणार (Memon has no sympathy)नाही. मात्र, कोविडमुळे बडी रात झाली नव्हती, त्यामुळे लायटिंग करण्यात आली होती, असे खतीब म्हणाले.

याकूब मेमनला सहानुभूती नाहीचं, जामा मस्जिद ट्रस्ट अध्यक्ष शोयब खतीबांचा खुलासा

भाजपचा मविआवर आरोप (BJP accuses MVA)दहशतवादी याकुबची कबर सजवण्यामागे महाविकास आघाडीचा हात आहे.भाजपचे आमदार राम कदम (ram kadam) यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभिकरण झालं, असा आरोप भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे. असा गंभीर आरोप भाजपने केला आहे. तर शिवसेना आणि काँग्रेसनेही भाजपवर पलटवार केला आहे. यावर बोलतानाचं, मेमनबद्दल सहानुभूती असण्याचे कारण नाही. पाच वर्षांपूर्वी जुना चौथरा तुटलेला होता म्हणून नवीन चौथरा बांधण्यास परवानगी दिली होती. अस स्पष्टीकरण जामा मस्जिद ट्रस्ट अध्यक्ष शोयब खतीबांनी दिल आहे.

विरोधकांच्या रडारवर भाजप याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभिकरणावरून काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे की, सर्वात मोठी चूक भाजपची आहे. यूपीए सरकारच्या काळात दोन कुख्यात दहशतवाद्यांना फाशी देण्यात आली. एक अफजल गुरू आणि दुसरा कसाब. मात्र सरकारने दोघांचेही मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवले नाहीत. कारण म्हणजे या लोकांच्या कबरी, ज्या ठिकाणी हे लोक दफन केले जातात, ती जागा कोणाला तरी रेलिंग पॉइंट बांधण्याची संधी देते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अंत्यसंस्कार झाले. इतके लोक का सामील झाले? भाजपने राजकीय फायद्यासाठी हे केले. याकुब मेमनच्या कबरीचा गौरव आज होत आहे. याला भाजप थेट जबाबदार आहे, असं अतुल लोंढे यांनी म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details