महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'आरे' येथे मेट्रो कारशेड हा भाजप सरकारचा हट्ट - जयराम रमेश - मुंबई आरे news

पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे पर्यावरणाबाबत बोलतात आणि दुसरीकडे अनेक राज्यात विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा विनाश करत असल्याची जयराम रमेश यांची टीका.

जयराम रमेश

By

Published : Sep 17, 2019, 4:44 PM IST

Updated : Sep 17, 2019, 5:20 PM IST

मुंबई -अनेक राज्यात विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा विनाश होत असल्याची टीका माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी मोदी सरकारवर केली आहे. आरेतील मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जयराम रमेश यांची 'आरे' येथे मेट्रो कारशेड उभारण्यावरून सरकरवर टिका

'आरे'मध्ये मेट्रो कारशेड हा सरकारचा हट्ट, विकासाचा हट्ट नाही. जंगल तोडून होणार असा विकास आम्हाला नको, असे जयराम रमेश यावेळी म्हणाले आहे.

हेही वाचा... तुरुंगात गेलेल्यांनी सांगू नये आम्ही काय केले; पवारांचा अमित शाहांना टोला

शिवसेनेने भाजपला आरेतील झाडांचे महत्व पटवून द्यावे - जयराम रमेश

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना पर्यावरणाची जाण असल्याचे जयराम रमेश यावेळी म्हणाले. पर्यावरण मंत्री असताना सामानातून माझ्या समर्थनार्थ लेख लिहल्याची आठवणही त्यांनी बोलून दाखवली. शिवसेनेने 'आरे'वर फक्त बोलू नये तर आपल्या मित्र पक्ष असलेल्या भाजपला आरेतील झाड किती महत्त्वाची आहे, हे पटवून द्यावे., असेही जयराम रमेश यावेळी म्हणाले.

हेही वाचा... गरज पडल्यास आरे परिसराला भेट देऊ - उच्च न्यायालय

आम्ही सत्तेत आल्यास मेट्रो कारशेड आरेत उभारणार नाही - जयराम रमेश

दोन दिवसापूर्वी मी संसदीय वन व पर्यावरण कमिटीच्या स्थायी समिती अध्यक्ष झालो. त्यातील 21 सदस्यांशी बोलून आम्ही आरेबाबत चर्चा करणार आहोत. तसेच स्थानिक नागरिक यांचे शिष्टमंडळ घेऊन माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी पंतप्रधान यांना भेटावे. आम्ही सत्तेत आल्यास मेट्रो कारशेड आरेत उभारणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा... नाणारचं झालं तेच आरेचं होईल - उध्दव ठाकरे​​​​​​​

Last Updated : Sep 17, 2019, 5:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details