महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Uddhav Thackeray Meeting Sanjay Raut संजय राऊतांना कारागृहात भेटण्यासाठी उद्धव ठाकरेंना जेल प्रशासनाची मनाई - Uddhav Thackeray visits MP Sanjay Raut jail

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय राऊतांची Shiv Sena chief Uddhav Thackeray visits MP Sanjay Raut jail जेलमध्ये भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या भेटीला जेल प्रशासनाने परवानगी नाकारल्याची माहिती आहे.

Uddhav Thackeray Meeting Sanjay Raut
Uddhav Thackeray Meeting Sanjay Raut

By

Published : Sep 7, 2022, 12:17 PM IST

Updated : Sep 7, 2022, 3:01 PM IST

मुंबई -सत्तासंघर्षाच्या सुनावणीनंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय राऊतांची Shiv Sena chief Uddhav Thackeray visits MP Sanjay Raut jail जेलमध्ये भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या भेटीला जेल प्रशासनाने परवानगी नाकारल्याची माहिती आहे. न्यायालयाच्या परवानगीशिवाय ठाकरेंना राऊतांची भेट घेता येणार नसल्याचे जेल प्रशासनाने म्हटले आहे.

पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केल्यानंतर सध्या संजय राऊत आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांची जेलमध्ये भेट घेण्यास माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. आर्रथररोड जेल प्रशासनाने उद्धव ठाकरे यांना कोर्टाकडून परवानगी घेऊन या आणि भेटा असे सांगितले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

यापूर्वी देखील शिवसेनेचे आमदार आणि खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांच्यासोबत आर्थररोड कारागृहात राऊत यांची भेट घेण्यास गेले होते. मात्र, तुरुंग प्रशासनाने त्यांची भेट देखील नाकारली होती. तुरुंगाच्या नियमानुसार केवळ रक्तातील नात्यातील व्यक्तीलाच कैद्याला भेटण्याची मुभा देण्यात येते.

संजय राऊत यांच्यावर ईडीचे कोणते आरोप -पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी Sanjay Raut and Patra Chawl land scam संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं, आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती, ते प्रविण राऊत हे नावालाच होते. या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीने केला आहे.




काय आहे पत्राचाळ घोटाळा?मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा म्हाडा भूखंड आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा 1,034 कोटी रुपयांचा आहे. पत्राचाळमध्ये राहणाऱ्या 672 भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली. तेव्हा हा घोटाळा सुरू झाला. ही चाळ विकसित करण्याचे कत्रांट महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिले होते. गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना 672 सदनिका देऊन 3 हजार फ्लॅट एमएचडीएला देणार होती. हे फ्लॅट 47 एकर जागेवर बांधले जाणार होते. मात्र गुरु आशिष कन्स्ट्रक्शनने तसे केले नाही. कंपनीने चाळीतील लोकांसाठी फ्लॅट बांधले नाहीत किंवा एमएचडीएला फ्लॅटही दिला नाही. कंपनीने ही जमीन अन्य आठ बिल्डरांना 1,034 कोटी रुपयांना विकली. हे दोन्ही घोटाळे करणाऱ्या एचडीआयएलचे संचालक प्रवीण राऊत, सारंग वाधवान, राकेश वाधवन आहेत.

Last Updated : Sep 7, 2022, 3:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details