मुंबई -कोरोना काळात चित्रपटसृष्टीशी निगडित अनेक मग ते छोटे मोठे कलाकार सर्वांना यांना फटका बसला आहे. त्यातून नैराश्यातून काही जणांनी आत्महत्या देखील केल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी नवोदित कलाकारांना सल्ला दिला आहे. आयुष्य फार मोठे आहे. परंतु, सर्वांचे तिकीट तयार आहे, जीवनाचा आनंद घ्या. आयुष्य हे फार सुंदर असून त्याला इतक्या सहजतेने संपवू नका, असे आवाहन श्रॉफ यांनी केले ( Jackie Shroff Appeal Newly Cine Artist ) आहे.
भाजपा मुंबई चित्रपट नाट्य आघाडीतर्फे चित्रपट, टेलिव्हिजन, ओटीटी या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन मुंबई दादर येथील प्रदेश कार्यालयात करण्यात आले होते. या प्रसंगी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, शिव ठाकरे, अभिनेत्री क्रांती रेडकर तसेच चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार उपस्थित होते. याप्रसंगी जॅकी श्रॉफ यांनी नवोदित युवक- युवतींना जगण्याचा कानमंत्र दिला.