मुंबई - मुंबई महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाची छापेमारीची घटना ताजी असतानाच शिवसेनेला आणखी धक्का बसला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी आणि मातोश्रीचे अतिशय जवळचे राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली ( IT Raid Shivsena Leader Rahul Kanal ) आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिर्डी देवस्थानचे विश्वस्त राहुल कनाल यांच्या मुंबईतील घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. तसेच, प्रादेशिक परिवहन विभागाचे वादग्रस्त अधिकारी बजरंग खरमाटे, सदानंद कदम यांच्याही घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकल्यानंतर मंत्री आदित्य ठाकरे यांना प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रावर यापूर्वीही आक्रमक झाली आहेत. हे दिल्लीचे आक्रमण आहे. जेव्हापासून निवडणुकीची घोषणा झाल्यापासून महाविकास आघाडीची भीती वाटू लागली आहे. हे उत्तर प्रदेश, हैदराबाद, बंगालमध्येही झाले आहे. आता महाराष्ट्रात सुरु आहे. सगळ्या केंद्रीय यंत्रणा या भाजपाच्या यंत्रणा झाल्या आहेत. महाराष्ट्र झुकणार नाही आणि महाराष्ट्र थांबणारही नाही, असा जोरदार पलटवार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
कोण आहे राहुल कनाल?