मुंबई : 'कोव्हिशील्ड' हे नाव वापरण्यापासून 'सीरम'ला आता थांबवणं योग्य नाही, कारण लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला तर देशातील लसीकरण मोहिमेवर परिणाम होईल असे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने ट्रेडमार्कच्या मुद्यावरून सीरम इन्स्टिट्यूटला मोठा दिलासा दिला आहे. पुण्यातील 'क्युटीस बायोटेक'ने दाखल याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदविले.
'कोव्हिशील्ड' हे नाव वापरण्यापासून 'सीरम'ला आता थांबवणे योग्य नाही - हायकोर्ट - कोरोना लसीकरण
मुंबई उच्च न्यायालयाने ट्रेडमार्कच्या मुद्यावरून सीरम इन्स्टिट्यूटला मोठा दिलासा दिला आहे. पुण्यातील 'क्युटीस बायोटेक'ने दाखल याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदविले.
तर लसीकरण मोहिमेवर परिणाम-हायकोर्ट
न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, नांदेड दिवाणी कोर्टाच्या आदेशानुसार, क्युटीस बायोटेकला सीरम संस्थेच्या विरोधात आदेश नाकारणे हा निर्णय योग्य होता आणि हायकोर्टाच्या हस्तक्षेपाची गरज नाही. कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी 'कोव्हिशील्ड' ही लस आहे. आता ती सर्वत्र प्रचलित आहे. सीरम संस्थेला त्यांच्या लसीसाठी 'कोव्हिशील्ड' नाव वापरण्यपासून थांबविण्याचा तात्पुरता आदेश, राज्यातील लस प्रशासन कार्यक्रमात गोंधळ आणि व्यत्यय आणू शकतो. दोन्ही उत्पादकांनी 'कोव्हिशील्ड' ट्रेडमार्कची नोंद नोंदविली नाही. खंडपीठाने असे निरीक्षण केले की, क्यूटिस बायोटेकच्या आधी एसआयआयने हे नाव अधिकृत स्वीकारले होते.
दोन्ही संस्थांकडून ट्रेडमार्कसाठी अर्ज
क्यूटिस बायोटेक आणि सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया प्रा. लिमिटेडने अनुक्रमे 29 एप्रिल 2020 आणि 6 जून 2020 रोजी 'कोव्हिशील्ड' ट्रेडमार्कच्या नोंदणीसाठी अर्ज केला होता. क्यूटिस बायोटेकने एसआयआयविरूद्ध पुणे येथील व्यावसायिक न्यायालयात दावा दाखल केला आणि एसआयआयला ट्रेडमार्क 'कोव्हिशील्ड' वापरण्यापासून रोखण्यात यावे आणि डिसेंबरमध्ये विक्री झालेल्याची नोंद ठेवावी असा अंतरिम आदेश द्यावा अशी मागणी कोर्टाकडे केली होती. पुणे खंडपीठाने दिलासा नाकारला, या कारणास्तव क्यूटिस हे ट्रेडमार्क पास करण्याच्या तिहेरी चाचण्या सिद्ध करु शकले नाहीत. परिणामी क्यूटिस बायोटेक यांनी वाणिज्य न्यायालय अधिनियम 2015 च्या कलम 1अन्वये उच्च न्यायालयात अपील केले होते.