मुंबई :१ नोव्हेंबरपासून चारचाकी वाहनांमधील सहप्रवाशांना सीटबेल्ट लावणं ( Seatbelts are mandatory in four-wheelers ) सक्तीचं होणार आहे. या नियमाचे ( Mandatory seat belt ) पालन न करणाऱ्या वाहनचालक, प्रवाशांवर मुंबई वाहतूक पोलीस १ नोव्हेंबरपासून दंडात्मक कारवाई करणाऱ ( Action for not wearing seatbelt ) आहेत. मुंबईत वाहतूक पोलिसांनी हा नव्याने कारवाईचा बड़गा उचलला आहे.
Seatbelt Mandatory : नोव्हेंबरपासून सीटबेल्ट बंधनकारक - wear seat belts in Mumbai
चारचाकी वाहनांमधील सहप्रवाशांना सीटबेल्ट लावणं आता बंधनकारक ( Seatbelts are mandatory in four-wheelers ) करण्यात आले आहे. 1 नोहेंबरपासून वाहनामधील चालकासह प्रवाशाला सीटबेल्ट लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. वाहतूक नियमाचा भंग ( Mandatory seat belt ) केल्यास पोलिस तुमच्यावर दंडात्मक कारवाई ( Action for not wearing seatbelt )करणार आहे.
![Seatbelt Mandatory : नोव्हेंबरपासून सीटबेल्ट बंधनकारक Seatbelt Mandatory](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16647460-51-16647460-1665757444623.jpg)
सीटबेल्ट न लावल्यास कारवाई -ज्या वाहनांमध्ये चालकाव्यतिरिक्त इतर सीटवर बसलेल्या प्रवाशांनी सीट बेल्ट लावला नसेल तर, त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल. कार मध्ये सहप्रवाशांसाठी सीडबिलची सुविधा नसल्यास ते उपलब्ध करून घेण्यासाठी 1 नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. देशभरात सध्या सुरक्षित वाहन प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या महिन्यात प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं कार अपघातात निधन झालं. त्यानंतर देशात अनेक राज्यात सुरक्षित वाहन प्रवासासाठी नवीन नियम लागू केले आहेत. काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत सीट चालक आणि सहप्रवाशांनी सीट बेल्ट लावणं बंधनकारक केलं आहे. आता असाच नियम मुंबईत देखील लागू करण्यात आला आहे.