मुंंबई - आयकर विभागाने अभिनेता सोनू सूदचे घर आणि कार्यालयावरील सर्वेक्षण आज दुसऱ्या दिवशीही सुरू ठेवले आहे. काल, 20 तासांहून अधिक काळ सोनू सूदच्या 6 ठिकाणी सर्वेक्षण ऑपरेशन करण्यात आले होते. आतापर्यंत आयटी विभागाने या सर्वेक्षणात काय साध्य केले, याची माहिती सामायिक केलेली नाही.
कालही केले होते 20 तास सर्वेक्षण -
दरम्यान, आयकर विभागाने बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून सोनू सूद याच्या निवासस्थान, कार्यालय आणि हॉटेलवर छापे टाकायला सुरुवात केली होती. त्यापैकी घरातील झाडाझडतीची मोहीम तब्बल 20 तास सुरु होती. यावेळी घरात सोनू सूद, त्याचे कुटुंबीय आणि संपूर्ण कर्मचारी होते. आयकर विभागाचे अधिकारी गुरुवारी पहाटे सोनू सूदच्या घरातून बाहेर पडले, तेव्हा त्यांच्या हातात काही फाईल्स होत्या. या सगळ्यातून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नेमके काय साध्य केले, अशी चर्चा सध्या सुरु आहे.
हेही वाचा - कन्हैया कुमार लवकरच काँग्रेसमध्ये?, राहुल गांधी यांची घेतली भेट