मुंबई - पूर्व उपनगरातील पालिकेच्या रुग्णालयातील आयसीयू विभागातील भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. आवश्यक अहर्ता प्राप्त न केलेले डॉक्टर आयसीयूत काम करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे चेतन आहिरे यांनी केला आहे. पालिकेने आयसीयू विभागात संबंधित डॉक्टर पूरवणाऱ्या संस्थेवर कारवाई न केल्यास मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आला आहे. माहिती अधिकाराअंतर्गत या संदर्भातील माहिती समोर आली असल्याचे आहिरे यांनी सांगितले.
पालिका रुग्णालया संदर्भातील माहिती विक्रोळी येथील महात्मा फुले रुग्णालयातील आयसीयू विभाग तीन महिन्यापासून बंद आहे. याचा पाठपुरावा करत असताना संबंधीत माहिती मिळाली आहे. पूर्व उपनगरातील काही पालिका रुग्णालयांतील आयसीयू विभागामध्ये डॉक्टर पुरवायचे काम जीवन ज्योती ही संस्था करते. मात्र, आयसीयूसाठी आवश्यक पात्रता असलेले डॉक्टर इथे नसल्याची माहिती समोर आली आहे. या विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक होत, त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
हेही वाचा -पत्रकाराला आमदार करणारा 'औरंगाबाद मध्य मतदारसंघ'
पूर्व उपनगरातील काही पालिका रुग्णालयात जीवन ज्योती ही संस्था आयसीयुसाठी लागणारे डॉक्टर पुरवते. मात्र, आमचा आरोप आहे की डॉक्टरसाठी जी पात्रता ठरविण्यात आली आहे. ती पात्रता ते डॉक्टर पूर्ण करत नाहीत. तसेच काही डॉक्टर हे 'डबल शिफ्ट'मध्ये रोज काम करत आहेत, अशी माहिती देखील हजेरी पटावरुन समोर आली आहे. यामुळे या डॉक्टरांवर आणि त्या संस्थेवर कडक कारवाई व्हावी, अशी आम्ही मागणी करतो, तसेच असे न झाल्यास आम्ही मोठे जन आंदोलन उभे करू उभे असे वंचित बहुजन आघाडीचे विक्रोळी तालुकाध्यक्ष चेतन अहिरे यांनी सांगितले.
हेही वाचा -संमोहनाला विज्ञानाच्या परिभाषेत मांडणारे एब्बे फारिया मृत्यूच्या दोनशे वर्षांनंतरही उपेक्षितच
दरम्यान, येथे रुजू होणाऱ्या डॉक्टर माहिती आम्ही घेत असतो. आमच्यात आणि जीवन ज्योती या संस्थेमध्ये झालेल्या कराराप्रमाणे आम्ही डॉक्टरांची नियुक्ती करतो. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आमचे अधिकारी असतात. यामुळे आमच्यावर केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य असल्यास आम्ही दंड आकारू, तसेच डॉक्टरांवर कारवाई करू असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.