महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धोकादायक शाळांचा प्रश्न, पटसंख्या राखण्यासाठी संक्रमण शिबिरांमध्ये शाळा - dangerous building

मुंबई महानगरपालिकेच्या ४५० शाळांच्या इमारती आहेत. त्यातून सुमारे पावणे तीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. काही वर्षांपूर्वी पालिका शाळांमधून साडे तीन लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत होते. यात गेल्या काही वर्षांत घट झाली आहे.

धोकादायक शाळांचा प्रश्न, पटसंख्या राखण्यासाठी संक्रमण शिबिरांमध्ये शाळा

By

Published : Aug 2, 2019, 12:04 AM IST


मुंबई -मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत चालली आहे. धोकादायक शाळांमुळे विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा शाळांच्या बाजूलाच संक्रमण शिबीर बांधून त्यात शाळा सुरू करण्याचे आदेश शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी पालिकेच्या शिक्षण विभागाला दिले आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या ४५० शाळांच्या इमारती आहेत. त्यातून सुमारे पावणे तीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. काही वर्षांपूर्वी पालिका शाळांमधून साडे तीन लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत होते. यात गेल्या काही वर्षांत घट झाली आहे. पालिका शाळा बंद होऊन इतर ठिकाणी सुरू केल्यामुळे त्या शाळांमधील विद्यार्थी कमी झाल्याचे समोर आले आहे. ज्या शाळांच्या इमारती धोकादायक ठरवण्यात आल्या त्या शाळांमधील विद्यार्थीही कमी झाल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी पालिका शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

धोकादायक शाळांचा प्रश्न, पटसंख्या राखण्यासाठी संक्रमण शिबिरांमध्ये शाळा

या बैठकीत पालिकेच्या ३० ते ३५ शाळा धोकादायक असल्याचे समोर आले आहे. जुहू, देवनार, नेहरू नगर, आगरवाडी या शाळा २०१३-१४ पासून पुनर्बांधणीसाठी बंद करण्यात आल्या. त्या शाळा अद्याप पुन्हा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. याबाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली, अशा शाळांमुळे विद्यार्थी संख्या कमी होत असल्याने धोकादायक शाळेच्या बाजूलाच संक्रमण शिबीर बांधून शाळा सुरू करावी, असे निर्देश अंजली नाईक यांनी दिले. या निर्णयामुळे पालिका शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांचा त्रास कमी होईल, असे नाईक यांनी सांगितले.

समिती निर्णय घेणार -
शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शाळांना भेटी दिल्या जातात. त्याचवेळी शाळांमधील दरवाजे, खिडक्या तुटल्या असल्यास त्या वॉर्डस्थरावर दुरुस्त कराव्यात. मोठ्या दुरुस्ती असल्यास त्यासाठी शाळा पायाभूत सुविधा विभाग, शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच संबधित शाळेमधील हेडमास्तर, शिक्षक यांची संयुक्त समिती स्थापन करून दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीचा निर्णय घ्यावा, असे निर्देश अंजली नाईक यांनी शिक्षण विभागाला दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details