महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

. . . आता हाऊसिंग सोसायट्यामध्येही सुरू झाले 'आयसोलेशन सेंटर'

मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्था आयसोलेशन सेंटर उभारण्यासाठी पुढे येत आहेत. कांदिवलीतील विश्वदीप सोसायटीने जिममध्येच अद्ययावत आयसोलेशन सेंटर तयार केले आहे.

Mumbai
आयसोलेशन सेंटर

By

Published : Jun 15, 2020, 4:01 PM IST

मुंबई- शहरासह उपनगरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्य सरकार आणि मुंबई महापालिका विविध माध्यमातून आयसोलेशन सेंटर उभारत आहे. आता तर मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्था ही यासाठी पुढे येत आहेत. कांदिवलीतील विश्वदीप सोसायटीने जिममध्येच अद्ययावत आयसोलेशन सेंटर तयार केले आहे. आता त्यांच्या पावलावर पाऊल टाकत अन्यही सोसायट्या यासाठी पालिकेकडे परवानगी मागत आहेत.

संशयित रूग्ण तसेच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना पालिकेच्या विविध आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवले जात आहे. पण संशयित आणि पॉझिटिव्ह रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणावर ताण पडत आहे. अनेक ठिकाणी रुग्ण-संशयितांना योग्य सुविधा मिळत नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता विश्वदीप सोसायटीने आपल्या सोसायटीतच आयसोलेशन सेंटर उभारले आहे. जिममध्ये दोन वॉर्ड तयार करण्यात आले असून येथे दोन जणांना आयसोलेट करता येणार आहे. या सेंटरमध्ये बेड, पीपीई कीटपासून ऑक्सिजनचीही व्यवस्था आहे. तर यासाठी त्यांना 50 हजारांचा खर्च आला आहे. असे सेंटर तयार करणारी ही मुंबईतील पहिली सोसायटी असल्याची माहिती पदाधिकारी निलेश शहा यांनी दिली आहे.

हे सेंटर तयार होऊन आठवडा झाला, तरी सुदैवाने अजून या सेंटरच्या वापराची गरज पडलेली नाही. कारण मार्चपासूनच या सोसायटीत लॉकडाऊनचे सर्व नियम पाळत असल्याने अजूनपर्यंत एकही सदस्य कोरोनाग्रस्त झालेला नाही, याचे समाधान असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. आता इतरही सोसायट्या असा उपक्रम राबविण्यास इच्छुक आहेत. त्यानुसार परळमधील अशोका टॉवर यादृष्टीने चाचपणी करत आहे. असे झाल्यास नक्कीच आरोग्य यंत्रणावरील ताण कमी होण्यास मदत होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details